16 April 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 16 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं

मुंबई : जनतेला खुश करण्यासाठी एकमेकांना स्वतंत्र निवडणुका लढण्याचा इशारा देणारे निवडणूक येताच ५०-५० फॉर्म्युला निश्चित करत पुन्हां एकत्र आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.

२०१४ पासूनच शिवसेना आणि भाजपचं हे राजकारण महाराष्ट्रासाठी नित्याचेच झाले आहे. निवडणूक लागल्या की लगेच ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना’ असच काहीस शिवसेना आणि भाजपचं सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच एकमत झाले असून उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x