19 April 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

सेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे

Environment Minister Aaditya Thackeray, Worli constituency,  Raj Thackeray, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज बाहेर गर्दी केली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी दिली. मागील विधानसभेत राज ठाकरे यांनी कौटुंबिक संबंध जपताना आदित्य ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिला नव्हता. दुसऱ्या बाजूला भाजपाशी युती असल्याने अमराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळाली होती. त्यात राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत आणून त्यांच्या विरुद्धची राजकीय स्पर्धा संपुष्टात आणली होती.

मात्र राजकरणात केवळ स्वार्थी निर्णय घेणाऱ्या शिवसेनेसोबत आगामी निवडणुकीत कोणी भावकीचे राजकीय संबंध, तर भाजपचे राजकीय संबंध कामी येणार नाहीत अशीच शक्यता आहे. सचिन अहिर यांना पक्षात आणून पदाधिकारी भूमिकेत ठेवलं आहे. त्यात पवारांशी पंगा घेतल्याने आणि त्यानंतर शिवसेनाच राष्ट्रवादीसोबत गेल्याने सचिन अहिर यांची पूर्ण राजकीय कोंडी झाली आहे. मात्र आगामी विधानसभेच्या वेळी मनसे राजकीय दृष्ट्या स्वार्थी झाल्याचं पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे अनेक मतदार संघात जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहेत. त्यात वरळी देखील असेल असं दिसतं आहे. वरळीतील अमराठी राजकारणामुळे तिथला मराठी माणूस मनसेकडे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळेच वरळी मतदारसंघातील नागरिकांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी हा प्रवेश केला आहे. वरळीमधील काही सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांनी मनसेत प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती संतोष धुरी यांनी दिली.

‘आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत वरळीच्या जनतेनं निवडून दिले आहे. ते चांगले काम करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांच्या कामाची प्रचिती इथल्या लोकांना झाली आहे. तुर्तास कोणत्याही निवडणुका नाही. पण मनसे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रवेश केला आहे’, असंही धुरी यांनी सांगितलं.

 

News English Summary: Citizens from the constituency of Aditya Thackeray, the state’s environment minister and MLA from Worli constituency, crowded outside Krishnakunj on Friday morning. MNS division president Santosh Dhuri informed that these people will join MNS in the presence of Raj Thackeray. In the last assembly, Raj Thackeray did not field a candidate against Aditya Thackeray while maintaining family ties.

News English Title: Environment Minister Aaditya Thackeray Worli constituency citizens Crowd will join MNS presence of Raj Thackeray Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x