25 April 2024 11:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा | यूपीत राष्ट्रपती राजवट लावा - स्वरा भास्कर

Actress Swara Bhaskar, President Rules, Uttar Pradesh, Hathras Gangrape

लखनऊ, ३० सप्टेंबर : माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

दरम्यान उत्तर प्रदेशात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मागील काही दिवसात पत्रकारांना सुद्धा ठार मारण्यात आलं आहे. राज्यातील कायदा सुव्यस्थेवर मोठं प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहेत. परिणामी अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. तसेच उत्तर प्रदेशात बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस केवळ एक उदाहरण आहे असं स्वराने म्हटलं आहे.

 

News English Summary: It’s time CM Yogi Adityanath should RESIGN. Under him utter breakdown of law and order in Uttar Pradesh. His policies have created caste strife, fake encounters, gang wars and there is a RAPE EPIDEMIC in Uttar Pradesh. Hathras case is only one example so Yogi Must Resign and President Rule In UP said Swara Bhaskar.

News English Title: Bollywood actress Swara Bhaskar twit about President Rules in Uttar Pradesh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x