18 April 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

अजब ! हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत

Protest agitation, Republican Party, Azad Maidan, Hathras Gangrape

मुंबई, ३० सप्टेंबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय.

दुसरीकडे सदर प्रकरणावर कोणतंही भाष्य न करता बॉलिवूडच्या अंतर्गत भानगडीत व्यस्त असल्याचं रामदास आठवलेंना सर्वानी पाहिलं आणि त्यांच्यावर चारही दिशेने टीकेचा भडीमार होऊ लागला आणि त्यानंतर सदर प्रकरणात त्यांनी भाष्य केलं आहे. हाथरसमधील पीडित दलित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्याविरोधात 1 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत.

दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला होता. उत्तर प्रदेशात कोणत्याही समाजातील कोणतीही महिला सुरक्षित नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच पोलिसांनी परस्पर पीडित मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता काल मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने अजून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: A protest agitation will be organized by the Republican Party at Azad Maidan, Mumbai on October 1 at 1 pm against the inhuman atrocities committed on a Dalit girl victim in Hathras. On October 2, RPI National President and Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale will pay a condolence visit to the families of the victim Dalit girl victim in Hathras.

News English Title: Protest agitation will be organized by the Republican Party at Azad Maidan after Hathras gangrape Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x