19 April 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Z-Plus दर्जाचं सुरक्षा कवच असताना राहुल गांधींना जमिनीवर पडेपर्यंत धक्काबुक्की

Congress leader Rahul Gandhi, Uttar Pradesh Police, Hathras

लखनऊ, १ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

हाथरस येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे व पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. एवढ्या मोठ्या गर्दीत त्यांच्यासोबत एखादा घातपात झाला असता तर याची जवाबदारी कोणी स्वीकारली असती.

२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात राहुल गांधी परिवाराची SPG सुरक्षा व्यवस्था काढून त्यांना Z Plus दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. स्वतः राहुल गांधी यांनी त्यावेळी ट्विट करून SPG अधिकाऱ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली होती. मात्र सध्या Z Plus दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना देखील पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडून जमिनीवर पाडलं तेव्हा हे सुरक्षा रक्षक नेमकं काय करत होते..त्यांना कोणी आदेश दिले होते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

News English Summary: In dramatic scenes on the highway between Delhi and Uttar Pradesh today, Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra were detained for defying a ban on large gatherings as they headed to Hathras to meet the family of the gang rape victim who died on Tuesday and whose dead-of-night cremation by the UP police has provoked nationwide outrage. Rahul Gandhi alleged that he was pushed to the ground and lathi-charged when he and Priyanka Gandhi were marching on the highway after their convoy was stopped by Uttar Pradesh policemen.

News English Title: Congress leader Rahul Gandhi arrested by Uttar Pradesh Police at Hathras Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x