24 April 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

योगी म्हणतात यूपीत दंगलीसाठी आतंरराष्ट्रीय फंडिंग | पण हे आहे सत्य

Uttar Pradesh, Hathras, Riots, justiceforhathrasvictim.cardd.co

मुंबई, ५ ऑक्टोबर : हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला. justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावं आणि काय करु नये हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अचानक बनवण्यात आली वेबसाईट:
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार एजन्सीने एका अशा वेबसाईटचा शोध लावला आहे ज्यात justiceforhathrasvictim.carrd.co या नावाने बनवण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये सांगितले होते की कसे सुरक्षितपणे याला विरोध केला गेला पाहिजे आणि पोलिसांपासून बचाव होईल. यासोबतच सगळ्या लोकांना याला जोडले जाण्यास सांगितले होते. याशिवाय यात असंही सांगण्यात आलं होतं की काय केले पाहिजे आणि काय नाही. तसेच या दंग्यादरम्यान सुरक्षित राहणे आणि अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्यास तसेच अटक झाल्यावर काय केले पाहिजे याचा उल्लेखही होता.

अशी होती योजना:
याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी, आयटी अधिनियतम आणि इतर अनेक कलमांतर्गत ३ ऑक्टोबरला केस दाखल केली. या वेबसाईटमध्ये देशातील दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद सारख्या ठिकाणी विरोध प्रदर्शन तसेच मार्च आयोजित करण्यावर जोर दिला होता.

वेबसाईट झाली बंद:
सुरक्षा एजन्सी जशा सक्रिय झाल्या तसेच वेबसाईटचे काम बंद झाले आणि वेबसाईटही बंद करण्यात आली. दरम्यान, या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली माहिती सुरक्षा एजन्सीजकडे सुरक्षित आहे. वेबसाईटवरून अनेक फोटोशॉप चित्र, फेक न्यूज आणि एडिट करण्यात आलेले व्हिजुअल्स ताब्यात घेण्यात आले आहेत. यूपी सरकारच्या माहितीनुसार वेबसाईटला इस्लामिक देशांकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळत होते आणि अॅमनेस्टी इंटरनॅशनलसोबत त्यांची लिंक असण्याबाबतही शोध घेतला जात आहे. असाही संशय व्यक्त केला जात आहे की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडीपीआय), नागरिकता संशोधन अधिनियम(सीएए)ही या विरोधी आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळाले होते.

युपी सुरक्षा एजन्सीच्या संशयावर प्रश्न उपस्थित:
एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला. justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. मात्र महाराष्ट्रन्यूजने केलेल्या पडताळणीत सदर वेबसाईटबाबत वेगळंच तथ्य समोर आलं आहे. कारण युपी सुरक्षा एजन्सीने दिलेली justiceforhathrasvictim.cardd.co ही सब डोमेन आधारित आहे. सदर वेबसाईटचा पॅरेन्ट (मूळ) डोमेन हा cardd.co आहे. म्हणजे कोणत्याही पॅरेन्ट डोमेनचे लाखो सबडोमेन केव्हाही बनवता येतात. त्यामुळे justiceforhathrasvictim.cardd.co डोमेन ब्लॉक करून काहीही फायदा नाही, कारण पॅरेन्ट डोमेन महत्वाचा असतो. उदाहरणार्थ कोणत्याही क्षणी justiceforhathrasvictimUP.cardd.co अशा सबडोमेनने पुन्हा वेबसाईट बनवता येऊ शकते.

दुसरीकडे सुरक्षा एजन्सीने केलेला दावा असा आहे की justiceforhathrasvictim.cardd.co वेबसाईट एका रात्रीत तयार करण्यात आली आहे. मात्र आम्ही केल्या पडताळणीत पॅरेण्ट (मुख्य) cardd.co डोमेन हा २० जुलै २०१७ रोजी रजिस्टर (विकत) घेण्यात आला होता आणि त्याचा पुरावा खाली दिला आहे. सदर डोमेनच्या मालकाचा पत्ता एस्टोनिया देशातील असून जो उत्तर युरोपमधून येतो. विशेष म्हणजे सदर डोमेन हा ऑक्शन म्हणजे ऑनलाईन लिलावासाठी ठेवला आहे आणि त्याची किंमत ३ लाख आणि १८ हजार अशी निश्चित करण्यात आली आहे.

त्यामुळे सदर डोमेन हा ३ वर्ष जुना आहे आणि जरी यूपी पोलिसांचं असं म्हणणं असेल की justiceforhathrasvictim.cardd.co वेबसाईट एका रात्रीत तयार केली आहे आणि एका रात्रीत इस्लामिक देशांकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळत होते तर ते हास्यास्पद म्हणावं लागेल. विशेष म्हणजे युपी पोलिसांनी एवढा मोठा फंडींगचा दावा असला तरी वेबसाईटच्या मालकाने तो ३ लाख आणि १८ हजार रुपयांना विकण्यास ठेवला आहे हे देखील हास्यास्पद आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या पडताळणीत सदर माहिती वास्तवाशी जुळणारी नाही असंच म्हणावं लागेल. वास्तविक अशा जातीय कंटेनच्या हजारो वेबसाईट्स मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत, ज्यामार्गे तरुणाचं धार्मिक ब्रेसवॉश होतं आहे.

 

 

News English Summary: In a surprising turn of events, Security agencies have uncovered a plot to instigate riots along caste lines and defame Chief Minister Yogi Adityanath government in Uttar Pradesh by using the Hathras incident. It is learnt that a website named ‘JusticeforHathras’ was created to disseminate fake information related to the incident in order to stoke sentiments and spark caste-based riots across the state. The dos and don’ts also included steps on how to stay safe during riots and in situations when tear gas shelling and arrests occur.

News English Title: Security Agencies Uncover Plot To Instigate Caste Riots Defame Uttar Pradesh Government Over Hathras Incident Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x