20 April 2024 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

हाथरस प्रकरण | आरोपींच्या समर्थनात भाजपकडूनच मेळावे | शिवसेनेचं टीकास्त्र

BJP rally in support, Of accused, Hathras Gangrape case, Shivsena

मुंबई, 06 ऑक्टोबर : ‘हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. हाथरसप्रकरणी जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या समर्थनार्थ हाथरसच्या आसपास मेळावे घेतले जातात व त्या मेळाव्यांचे नेतृत्व भाजपचे पुढारी करतात असे प्रसिद्ध झाले आहे. तसे काही खरोखरच घडले असेल तर ते कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणेच आहे.’ अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. तसंच, ‘पीडित मुलीलाच सरकारने जाळून राख केले व पुरावे मातीत मिसळले. हे सर्व हाथरसच्या पोलिसांनी ‘वर’ विचारल्याशिवाय केले काय? सगळे काही संगनमतानेच झाले आहे’ असा थेट आरोपही शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा हाथरस प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.

हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना-कंगना वादानंतर प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडणारी कंगना याप्रकरणावर गप्प का? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला होता. त्यानंतर, आता पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेवरुनही शिवसेनंन प्रश्न उपस्थित केला आहे.

”मुंबईतल्या एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे. स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावाच, पण शस्त्रखरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली. ही पहिली ठिणगी आहे. त्या ठिणगीत तेल ओतण्याचे काम तरी सरकारने करू नये. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे.

 

News English Summary: Rallies are being held around Hathras in support of the accused arrested in the Hathras case and it has been reported that these rallies are led by BJP leaders. If something like that really happened, it would be embarrassing and disgusting. ‘ Shiv Sena has made such criticism on BJP.

News English Title: BJP to rally in support of the accused in the Hathras Gangrape case say Shivsena Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x