20 April 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

Republic TV'च्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार | CFO'ला समन्स

TRP Scam, Republic TV, CFO summoned, Mumbai Police

मुंबई, ९ ऑक्टोबर : चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबईपोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल दिली. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. आज दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल. माहितीनुसार, पुरावांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा रिपब्लिक टीव्हीवरही नोंदविला जाऊ शकतो. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील समन्स बजावले जाणील. त्यांना तपास पथकासमोर हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते.

या तपासात गुन्हे शाखेचे सीआययू एसीपी शशांक सांडभोर हे प्रमुख आहेत तर डीसीपी आणि जॉईंट सीपी या तपासात मदत करत आहेत. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या वाहिन्यांकडे जो निधी आला आहे तो टीआरपीशी छेडछाड करून मिळतो की नाही ते तपासून त्यानुसार कारवाई केली जाईल का याचीही चौकशी केली जाईल. देशाच्या इतर भागातही असेच रॅकेट चालविण्यात येत असल्याचा मुंबई पोलिसांचा संशय आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी असेही म्हटले आहे की दोषी, ते कोणीही असू शकतील त्यांची चौकशी केली जाईल आणि “आम्ही या फसवणूकीचे प्रकरण योग्य त्या निष्कर्षापर्यंत नेऊ”. बनावट टीआरपीचे रॅकेटचा भांडाफोड मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने केला आहे.

दरम्यान, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स घोटाळा प्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला Exclusive मुलाखत दिली. टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर (पॉलिटिक्स) नाविका कुमार यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना जावडेकर यांनी सर्व माध्यमांना उद्देशून एक सल्ला दिला. मीडियाने टीआरपीच्या मागे धावू नये, असे जावडेकर म्हणाले.

बार्क हे प्रकरण हाताळेल – जावडेकर
टीआरपी घोटाळ्यात ३ चॅनलचे नाव आल्यानंतर जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. आधी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून टीआरपी निश्चित केला जात होता. आता ब्रॉडकास्टर एकत्र आले आणि त्यांनी बार्क या संस्थेची स्थापना केली. ही संस्था टीआरपी बघते. टीआरपी निश्चित करण्याच्या व्यवस्थेतील दोष दूर करण्याची जबाबदारी बार्कची आहे. याआधीही वेळोवेळी टीआरपीच्या मुद्यावर तक्रारी आल्यानंतर संबंधित व्यवस्थेने टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ते बदल केले. आता या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी बार्क ही संस्था आहे. त्यांनी टीआरपी निश्चित करण्याच्या व्यवस्थेतील दोष दूर करणे आवश्यक आहे. सरकार यात थेट हस्तक्षेप करणार नाही. जर काही घोटाळा असेल तर तो विषय न्यायालय हाताळेल.

माध्यमांना स्वातंत्र्य आहे:
भारतात माध्यमांना स्वातंत्र्य आहे. माध्यमांवर बंधनं लादू नये या मताचेच हे सरकार आहे. आम्ही आपातकाळ अनुभवला आहे. त्यावेळी माध्यमांवर लादलेली बंधनं बघितली आहेत. हे प्रकार आम्ही करणार नाही, असे जावडेकर म्हणाले.

 

News English Summary: In connection with the ongoing TRP fraud case probe, the Mumbai Police on Friday has summoned the Chief Financial Officer (CFO) of Republic TV, Shiva Sundaram. The CFO has been summoned on 10 October at 11 am. Apart from Republic TV, Sam Balsara founder, chairman and managing director of Madison World and operational head of Lowe Lintas Shishir Sinha have also been summoned to record their statement in connection with the TRP scam.

News English Title: TRP Scam Republic TV CFO summoned by Mumbai Police Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x