20 April 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा
x

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात फडणवीसांची 'लाव रे तो व्हिडीओ' रणनीती

Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray, Ajit Pawar

उस्मानाबाद, २० ऑक्टोबर : राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखणेवर मीठ चोळण्याचं काम करु नये,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळालेला दिसत नाही अशी टीका करताना इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, घोषणा करुन समाधान होणार नाही असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी रहा’, असे सांगतोय़ उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचे सांगून पद्मसिंह यांच्या कुटूंबास आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवार यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले. शिवाय डॉ. पाटील यांचे नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात जोडले!

 

News English Summary: Fadnavis showed a video of Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar demanding Rs 25,000 per hectare when they were not in power. He said that this is a good opportunity for the Chief Minister to fulfill his demand. Criticizing the Chief Minister’s visit, he said there was no relief.

News English Title: Devendra Fadnavis shows old video of Uddhav Thackeray and Ajit Pawar News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x