20 April 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

नासा चंद्रावर 4G कनेक्टिव्हिटी मोबाइल नेटवर्क तयार करणार

NASA launching, 4G mobile network, Nokia

वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने चंद्रावर मोबाइल नेटवर्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी नासा फिनलंडच्या नोकिया कंपनीची मदत घेणार आहे. एकेकाळी मोबाइल क्षेत्रात दादा कंपनी असलेली नोकिया (Nokia) 4G कनेक्टिव्हिटी पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. याबाबत निकियाने अधिकृत प्रेसनोट देखील प्रसिद्ध केली आहे.

भविष्यात मानवी वस्तीची व्यवस्था करण्यासाठी चंद्रावर मोबाइल नेटवर्क तयार केले जाणार आहे. नासा २०२४ पर्यंत यानातून एक पुरुष आणि एक महिला अशा दोन अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. नोकियाने नासाकडून काम मिळताच चंद्रावर २०२२ पर्यंत 4G कनेक्टिव्हिटी नेटवर्क उभारण्याचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले. नेटवर्क उभारुन नोकिया चंद्रावर इंटरनेट तसेच मोबाइलद्वारे संवाद साधण्याची व्यवस्था करुन देणार आहे.

चंद्रावरील विशिष्ट भागात नेटवर्क तयार करण्यासाठी नासा २७.१३ अब्ज रुपये (३७० मिलियन डॉलर) खर्च करणार आहे. चंद्रावर एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर गेल्यानंतर ते इंटरनेट आणि मोबाइलच्या मदतीने नासाच्या संपर्कात राहू शकतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चंद्रावरील मानवी वस्तीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

चंद्रावर नेटवर्क निर्मितीसाठी नोकियासह १४ कंपन्या संयुक्तपणे काम करणार आहेत. यात नोकियाकडे सर्वात मोठी जबाबदारी आहे. चंद्रावरील वातावरणात दीर्घकाळ टिकून राहू शकेल आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करुन कार्यरत राहून शकतील असे टॉवर विकसित केले जातील. स्वतःच ऊर्जा निर्माण करू शकतील अशी यंत्रणाही टॉवरमध्ये असेल. कमीत कमी वजनाची ही यंत्रणा असेल. यासाठी सरफेस पॉवर जनरेशन, क्रायोजेनिक फ्रीजिंग, रोबोटिक्स असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान संयुक्तपणे वापरले जाईल. नेटवर्क निर्मिती प्रकल्पात नोकिया व्यतिरिक्त स्पेसएक्स, लॉकहीड मार्टिन, सिएरा, यूएलए, एसएसएल रोबोटिक्स या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे.

नासा चंद्रावर राहण्यासाठी आवश्यक वेगवेगळ्या सोयीसुविधा यानातून पाठवणार आहे. यात अन्न, पाणी, राहण्यासाठी तंबू, टॉयलेट असे बरेच काही असेल. अलिकडेच नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (International Space Station – ISS) १७४ कोटी रुपयांचे युनिसेक्स टॉयलेट (UNISEX TOILET) पाठवले. पुरुष आणि महिला दोघेही आरामात या टॉयलेटचा वापर करू शकतात. अंतराळात मर्यादीत जागेचा सुयोग्य वापर करण्याच्यादृष्टीने हे टॉयलेट डिझाइन करण्यात आले आहे. या युनिसेक्स टॉयलेटच्या निर्मितीसाठी तज्ज्ञांना सहा वर्ष कठोर परिश्रम करावे लागले. अंतराळातील सर्व अडीअडचणींचा विचार करुन हे टॉयलेट तयार करण्यात आले.

 

News English Summary: Just as 5G arrives on planet Earth, its predecessor is heading to the moon. NASA has selected Nokia to build the first-ever 4G mobile network on Earth’s natural satellite, the Finnish telecommunications firm announced Monday. The company’s U.S. industrial research arm, Bell Labs, is offering up its equipment to NASA to help build out the lunar network, with the aim of launching it in late 2022. “The solution has been specially designed to withstand the harsh conditions of the launch and lunar landing, and to operate in the extreme conditions of space,” Nokia said in a press release. Under its Artemis program, NASA plans to send astronauts to the moon by 2024 — for the first time in five decades — followed by a “sustainable” human presence by 2028.

News English Title: NASA is launching a 4G Nokia mobile network on the moon News updates.

हॅशटॅग्स

#NASA(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x