25 April 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

तरुणाचा रोहित पवारांना मेगा पोलीस भरती बाबत प्रश्न | रोहित पवारांकडून सकारात्मक बातमी

Maharashtra Police Recruitment 2020, notification , MLA Rohit Pawar, MPSC Exam 2020

मुंबई, २१ ऑक्टोबर: महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.

याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी काढले होते. उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे होते. हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. त्यात मराठा आरक्षणावरून MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने मेगा भरतीवरून तरुणांच्या मनातील प्रश्न वाढू लागले आहेत. त्यामुळे तरुण समाज माध्यमांच्या मार्फत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारात आहेत.

ज्या युवाशक्तीच्या जोरावर आपण महासत्ता बणण्याचं स्वप्न बघत होतो, आज तीच युवाशक्ती बेरोजगारीच्या भयंकर संकटात अडकली आहे. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांना एका बेरोजगार तरुणान प्रश्न विचारला असता ‘लवकरच सकारात्मक बातमी मिळेल’, असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहे.

दरम्यान, ‘दादा, तुम्ही प्रत्येक पक्षाच्या आमदार-खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. रिप्लाय देतात पण ज्या बेरोजगार तरुणांनी/मजूरांनी तुम्हाला सत्तेवर बसवले त्यांच्या 72000 जागांच्या मेगा भरती विषयी विद्यार्थी तुम्हाला सारखं प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही गप्प का? असा सवाल एका बेरोजगार तरुणानं विचारला आहे.

यावर रोहित पवार ट्वीटकेले आहे की ,”मेगाभरतीचा शब्द आम्ही पाळणार आहोत. आतापर्यंत हे विचारण्याची वेळच तुमच्यावर आली नसती, पण आपण पाहत आहात की सरकार आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकट येतायेत. तरीही सरकारला युवांची काळजी आहे. लवकरच आपल्याला सकारात्मक बातमी मिळेल.’

 

News English Summary: We were dreaming of becoming a superpower on the strength of youth, today the same youth is stuck in a terrible crisis of unemployment. When an unemployed youth asked MLA Rohit Pawar about this issue, Rohit Pawar hinted that he would get positive news soon. Meanwhile, ‘Dada, you wish each party MLA-MP a happy birthday. But do you remain silent when students ask you similar questions about the mega recruitment of 72000 vacancies by the unemployed youth, the workers who put you in power? This question has been asked by an unemployed youth.

News English Title: Maharashtra Police Recruitment 2020 notification MLA Rohit Pawar replay to youngster News updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x