29 March 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

मी AXIS बँकेसाठी 18 वर्ष काम केले | दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि परिश्रम कसे समजतील?

Amruta Fadnavis, taunts , Shivsena MP Priyanka Chaturvedi, Police salary account, AXIS bank

मुंबई, २३ ऑक्टोबर: मुंबई पोलिसांची पगार खाती ‘अ‍ॅक्सिस बँके‘तून ‘एचडीएफसी’मध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्विटरवर वाकयुद्ध रंगले. दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? अशा शब्दात मिसेस फडणवीसांनी चतुर्वेदींना टोला लगावला.

“मुंबई पोलिस लवकरच अ‍ॅक्सिस बँकेतून 50 हजार पोलिसांची पगार खाती हस्तांतरित करतील. मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती, हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता” असे ट्विट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.

त्यावर अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “एका गोष्टीचा मला पुनरुच्चार करायचा आहे, अ‍ॅक्सिस बँकेच्या सरकारी विभागाकडून (आधीची यूटीआय बँक) पोलिस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय केवळ बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर होते. 29 ऑक्टोबर 2005 रोजी यासंबंधी शासन आदेश निघाला होता. घाणेरडे राजकारण प्रामाणिक आणि कणखर व्यक्तींना फसवू शकत नाही” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

चतुर्वेदींच्या ट्विटला अमृता फडणवीसांनी उत्तर दिले. “अ‍ॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खाजगी क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी 18 वर्ष काम केले आहे. संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? ही खाती 2005 आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती.” असा टोला अमृता फडणवीसांनी चतुर्वेदींना लगावला.

 

News English Summary: It was decided to transfer the salary accounts of Mumbai Police from Axis Bank to HDFC. Opposition leader Devendra Fadnavis’ wife Amrita Fadnavis and Shiv Sena Rajya Sabha MP Priyanka Chaturvedi then engaged in a war of words on Twitter. How will the defectors understand honesty and hard work? With such words, Mrs. Fadnavis slammed Chaturvedi.

News English Title: Amruta Fadnavis taunts Shivsena MP Priyanka Chaturvedi on police salary account transfer from AXIS bank to HDFC News updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x