19 April 2024 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

चर्चा तर होणारच | शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत आज एका मंचावर?

MNS Chief Raj Thackeray, MP Sanjay Raut, Sharad Pawar

मुंबई, २४ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी हे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे कारण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या तिन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. ‘चौकात उधळले मोती’ या अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊ आणि राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज ठाकरे यांचा पक्ष सध्या विरोधकाच्या भूमिकेत आहे. राज यांचा पक्ष अधूनमधून सरकारच्या भूमिकांवर टीका करत असतो. अलीकडेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राज्यातील ठाकरे सरकारबरोबरच ठाकरे कुटुंबीयांवर व्यक्तिगत आरोप करण्याचेही प्रयत्न झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून राज ठाकरे यांना साद घातली होती. ‘ठाकरे’ ब्रँडची आठवण करून दिली होती. त्यावर मनसेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी राज यांनी मौन बाळगले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पवार व राऊत यांच्यासोबत दिसणार आहेत. यावेळी ते काय बोलतात आणि त्याला इतर दोन नेते कसा प्रतिसाद देतात, याबद्दल उत्सुकता आहे.

याआधी, राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनीही शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेतलेली आहे. पुण्यात 2017 मध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली ‘महामुलाखत’ चांगलीच गाजली होती. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंच्या प्रश्नांच्या चेंडूंवर पवारांनी तूफान फटकेबाजी केली होती.

 

News English Summary: NCP president Sharad Pawar, Shiv Sena MP Sanjay Rau and MNS president Raj Thackeray are the three veterans of Maharashtra politics who will come on the same stage. The three veteran leaders are expected to be on the same platform for the book launch event of renowned author Ambareesh Mishra as the three leaders have been invited for the book launch. The book written by Ambareesh Mishra titled ‘Choukat Udhalele Moti’ will be published at Yashwantrao Chavan Center in Mumbai.

News English Title: MNS Chief Raj Thackeray MP Sanjay Raut And Sharad Pawar Likely To Share Dais For This Reason News Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x