19 April 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे जनतेनेच ठरवावे | सुजय विखेंच वक्तव्य

BJP MP Sujay Vikhe Patil, clears his stand, K K Range

कर्जत-जामखेड, २४ ऑक्टोबर : नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.२४ आॅक्टोबर) टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली.

नगर जिल्ह्यातील नगर-जामखेड रोड, बाह्यवळण रस्ता, के. के. रेंज, उढ्ढाण पूल व प्रत्येक मोठी विकास कामे ही संरक्षण खात्याशी निगडीत आहेत. या कामांसाठी मलाही वारंवार दिल्लीला जावे लागते. यामुळे आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. तरच जिल्ह्यातील रखलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या कामांना गती येईल, असेही डॉ. विखे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील सध्याचे तीन नवे मंत्री आणि काही आमदार आपण किती साधे आहोत याचा आव आणीत आहेत. हा फक्त प्रसिध्दीचा स्टंट आहे. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही चप्पल घालून फिरत असला म्हणून तुम्ही संत झालात काय? असा सवाल विखे यांनी केला. तर दुसºयाच्या कामांचे श्रेय घेतले तर मतदारसंघात येऊन पोलखोल करील, असा इशाराही विखे यांनी मंत्री गडाख, तनपुरे यांचे नाव न घेताना दिला.

तसेच ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे आता जनतेनेच ठरवावे,’ असे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. ‘भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे.

के के रेंज विस्ताराचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये चांगलाच ऐरणीवर आला आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यातील २३ गावातील जमीन अधिग्रहण होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तर, खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही संरक्षणमंत्र्यांना भेटले होते. त्यानंतर मात्र के के रेंज विस्ताराबाबत दोन्ही पक्षांकडून विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

 

News English Summary: Nagar-Jamkhed Road in Nagar District, Bypass Road, K. K. The range, the flyover and every major development work are related to the Department of Defense. I also have to go to Delhi frequently for this work. Because of this, I have to be the defense minister now. Only then will the work of big projects in the district gain momentum. BJP MP Sujay Vikhe Patil said this time.

News English Title: BJP MP Sujay Vikhe Patil clears his stand over K K Range issue News Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x