25 April 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कोरोनामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे आता त्यांना समजलं असेल - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Devendra Fadnavis

मुंबई, २५ ऑक्टोबर: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा अनन्यसाधारण महत्व आहे. कारण यावर्षी फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचं म्हटलंय. बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखाचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे.

या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, करोना नसता तर शिवतिर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं दौरे करत आहोत. त्यांना काळजी घेण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे आता त्यांना समजलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. शासकीय रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.

 

News English Summary: Leader of Opposition Devendra Fadnavis is constantly touring. We advised them to take care. They are infected with corona. They now understand how serious the situation is. We pray at the feet of Mother Jagdamba for their health. He has made a good decision by being admitted to a government hospital.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut message to Devendra Fadnavis about situation after corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x