25 April 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Health First | बांबू राईस | मधुमेह, सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी

Bamboo Rice, Health benefits, Health article

मुंबई, २६ ऑक्टोबर: सध्या बांबू राइसची (Bamboo Rice) चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. त्याची कारणेही निरनिराळे आहेत, पण त्यातील एक म्हणजे प्रमुख आजारांपैकी असलेले मधुमेह आणि सांधेदुखीपासून जर आराम हवा असेल तर बांबू राईस खाणे उपयुक्त ठरेल. बांबू राईस हा अतिरिक्त कोलेस्टेरॉलची समस्या, तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. भारतातील काही राज्यांनी या बांबू राईसचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन केले आहे. जंगलात राहणारे वनवासी, आदिवासी बांधवांना बांबू राईस हे एक रोजगाराचे आणि उत्पन्नाचे साधन म्हणून नावारुपास येत आहे.

जर आपण बांबूचा उपयोग बघितला तर आतापर्यंत बिस्कीट, कुकीज, विविध बाटल्या इत्यादी निर्मितीसाठी बांबूचा उपयोग करण्यात यश आले आहे. परंतु आता काही राज्यांनी औषधी गुणांनी युक्त बांबू तांदुळाचे उत्पादन घेण्यात लक्ष देण्याचे नियोजन केले आहे. बांबुच्या झाडाला जी फुले येतात व त्यापासून बिया मिळतात ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. बांबू राईस म्हणजे बांबू पासून मिळणारा तांदूळ किंवा त्याला स्थानिक भाषेमध्ये ‘मुलायरी’ असे म्हणतात. हा वर्षातून फक्त एकदाच मिळतो. बांबूच्या झाडाचा जेव्हा कालावधी असतो किंवा अंतिम टप्प्यात येते तेव्हा त्या झाडाच्या शूटपासून झेडपी आणि मिळते. त्याला मुलायरी म्हणतात.

हा राईस पोस्टीक आणि आरोग्यवर्धक आहे. तो कप, पित्तदोष बरा करतो तसेच शरिरातील अनेक विषारी घटक बाहेर काढून टाकत असल्याचेही संशोधकांचे मत आहे.आपल्या वापरातील पांढऱ्या तांदळाला बांबू राईस हा चांगला पर्याय ठरेल, असा विश्वास त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी व्यक्त केला. प्रमुख तांदूळ उत्पादक जे राज्य आहेत, त्यापैकी ओडिसा केरळ या ठिकाणीही हा राईस येतो. या राज्यांनी नद्यांच्या काठावर, रस्त्याच्या कडेला आणि पडीक जमिनीला बांबूची लागवड चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बांबू राईसचे गुणधर्म:
तुलनेने गहू आणि तांदूळापेक्षा अधिक प्रमाणाचे प्रथिने याच्यात असतात. डायबिटीस वर उपयुक्त आहे, तसेच शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. शरिरातील वाढलेले कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. बांबूमुळे रोजगार निर्मिती होते तसेच बांबू हे पीक पर्यावरणपूरक व पुनरुत्पादन होणारे पीक आहे. बांबू शेती आणि बांबू उद्योगाला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. बांबू राइस आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असल्याने त्यातून रोजगार निर्मितीलाही मोठा वाव आहे.

बांबू राईस सामान्यतः उपलब्ध होत नसतो कारण वयाने जास्त असलेल्या झाडाला फुले येणारी बरीच वर्षे लागतात. आमच्या काही प्रजाती ४० ते ५० वर्षात एकदाच फुलांनी बहरतात आणि नंतर मरतात. मरताना ते भरपाईसाठी मोठ्या प्रमाणात फुल व बिया यामागे सोडतात. विशिष्ट प्रकारच्या प्रजातींचे सुचीत्वा सुनिश्चित करण्यासाठी निसर्गाची ही यंत्रणा असल्याचे आदिवासी शेतकरी सांगतात.

 

News English Summary: Bamboo Rice- Unfolding its StoryBamboo rice is special rice that is grown out of a dying bamboo shoot. When the bamboo shoot breathes its last, it flowers into a rare variety of rice seeds, which are known as bamboo rice. It is said that the bamboo rice harvesting is a major source of income for the tribal communities living in the interiors of Wayanad Sanctuary in Kerala. The sanctuary makes a rich habitat to bamboo groves, where many small tribal communities still bide. Harvesting and collecting this rice is their source of income as well as their daily food intake. You will find women and children from these indigenous communities in the region collecting and selling these seeds. Bamboo rice like any other rice is rich in various nutrients including carbohydrates, fiber and protein. It is believed that bamboo rice has low glycemic index compared to other varieties of rice, which is considered to be a healthier option for diabetics. The rice has low or no fat and is rich in vitamin B. The tribes in Kerala use this rice to cure joint pain owing to the presence of immense calcium and phosphorus content.

News English Title: Bamboo Rice benefits for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x