19 April 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Health Benefits of Cauliflower | फुलकोबीचे 10 आरोग्यदायी फायदे

health Benefits of Cauliflower

मुंबई, १ नोव्हेंबर: फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी (Health Benefits of Cauliflower) आहे, याचा वापर फक्त भाजी बनविण्यासाठीच नव्हे तर वेगवेगळे चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्यासाठी देखील केला जातो. याची भाजी जरी साधारण असली तरी या पासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.

Health Benefits of Cauliflower. One cup of raw cauliflower provides over 75% of the daily minimum target for vitamin C. In addition to supporting immunity, this nutrient is needed for DNA repair and the production of both collagen and serotonin :

  • फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि लोहच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन आणि पोटॅशियम आणि थोड्यातच प्रमाणात तांबा असतो. फुलकोबी आपल्याला एकाच वेळी बरीच पोषकद्रव्ये मिळवून देतात.
  • रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ततेसाठी फुलकोबी खूप फायदेशीर आहे. या साठी आपण याला कच्चं सॅलडच्या रूपात किंवा याचे ज्यूस बनवून देखील घेऊ शकता. या दोन्ही पद्धती उत्तमरीत्या कार्य करतील.
  • सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या दुखण्यात देखील फुलकोबी आणि गाजराचे रस सम प्रमाणात पिणं फायदेशीर असत. सलग तीन महिने त्याचे सेवन केल्यानं फायदेशीर असणार.
  • कोलायटिस, पोटदुखी किंवा पोटाशी निगडित इतर समस्यांमध्ये फुलकोबी फायदेशीर असते. तांदुळाच्या पाण्यात शिजवून याचा हिरव्या भागाचे सेवन केल्यानं पोटाच्या त्रासापासून सुटका होते.
  • यकृतामध्ये असलेले एंझाइम’ ला सक्रिय करण्यामध्ये कोबीचे सेवन फायदेशीर असतं. याच्या सेवनामुळे लिव्हर योग्य प्रकारे कार्य करतं आणि शरीरातून विषारी घटकांना काढून टाकतं.
  • घशाचे त्रास जसं की घशा दुखणं, सूज येणं असल्यावर फुलकोबीच्या पानांना वाटून त्याचा रस काढून प्यायलानं घशाचा समस्यांपासून फायदा मिळतो.
  • हिरड्यांमध्ये वेदना होणं, किंवा हिरड्यांमधून रक्त येणं सारखे त्रास असल्यास कोबीच्या पानाच्या रसाने गुळणे करावे. हे फायदेशीर ठरेल. फुलकोबी पॅराथायराइड ग्रंथीच्या व्यवस्थित कार्याची अमलबजावणीसाठी उपयुक्त आहे.
  • गरोदरपणात फुलकोबी फायदेशीर असते. ही फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ने समृद्ध असते आणि पेशींच्या वाढीसह हे गर्भात वाढणाऱ्या गर्भाला देखील फायदेशीर असते. फुलकोबी हे व्हिटॅमिन सी चे उत्कृष्ट स्रोत आहे.
  • वजन कमी करण्यात देखील हे फायदेशीर आहेत. या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी जास्तची चरबी कमी करण्यास मदत करते. त्या मधील असलेले फॉलेट लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करते. या मध्ये स्टार्च नसतं.
  • हे अँटी ऑक्सीडेन्ट तसेच कॅल्शियमने समृद्ध आहेत, जे मज्जासंस्थाला बळकट करतं. कॅल्शियम आपली हाडं आणि दात बळकट बनवत आणि शरीराच्या योग्य अमलबजावणीस मदत करतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News English Title: Health Benefits of Cauliflower in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x