20 April 2024 9:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

काश्मिरात सुरक्षा दलांची मोठी कारवाई | हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरचा खात्मा

Hizbul operation, chief Dr Saifullah, killed in encounter, CRPF

जम्मू-काश्मीर, १ नोव्हेंबर: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला आहे. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, रंगरेथ भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्करानं मोहीम घेतली. यावेळी लष्करानं केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा मुख्य कमांडर डॉ. सैफुल्ला मरण पावला. तर त्याच्या एका सहकाऱ्याला जिवंत पकडण्यात आलं आहे.

जॉईंट ऑपरेशनमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडर सैफुल्लाह उर्फ गाजी हैदरचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ऑपरेशन दरम्यान सैफुल्लाह नावाच्या एका कमांडरचा खात्मा केला आहे. त्याची ओळख पटवण्यात येत आहे. मात्र तो 95 टक्के सैफुल्लाह असल्याची आमची खात्री आहे. तसेच एका दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हिजबुलचा म्होरक्या सैफुल्ला मीर हा २०१४ मध्ये संघटनेत सहभागी झाला होता. तो पुलवामातील मलंगपोरा येथील आहे. सैफुल्लाला रियाज नायकू यानं संघटनेत घेतलं होतं. त्याचबरोबर गाझी हैदर असं नावही दिलं होतं. रियाज नायकू मे मध्ये झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर हिजबुल मुजाहिदनचं नेतृत्व सैफुल्लाकडे आलं होतं.

 

News English Summary: Hizbul Mujahideen operations chief Dr Saifullah has been killed in an encounter in Jammu and Kashmir in Srinagar by security forces on Sunday. Inspector-General of Police Kashmir Vijay Kumar told media that Saifullah, the chief commander of terrorist organisation Hizbul Mujahideen has been killed while one militant associate has been apprehended alive in the encounter that took place in the Rangreth area.

News English Title: Hizbul operation chief Dr Saifullah killed in encounter in Srinagar News Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x