20 April 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मेट्रो ३ कांजूरमार्गच्या जमिनीवर केंद्राचा दावा | मोदी सरकार व गुजरात केडरचे अधिकारी सरसावले

Modi government, Stop notice, car shed Kanjurmarg

मुंबई, ३ ऑक्टोबर : ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करून कागदोपत्री आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर राज्य सरकारचा सर्वबाजूंनी कौतुक करण्यात आलं होतं. या निर्णयानंतर राज्यातील भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र यामध्ये केंद्रातील मोदी सरकारने आडकाठी घातल्याने खळबळ माजली आहे.

त्यामुळे आता मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील केली होती. परंतु, आता मोदी सरकारने थेट कांजूरमार्गमधील संबंधित जागेवर आपला दावा केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) ठाकरे सरकारला धाडलं आहे.

मुंबईच्या कांजूरमार्गस्थित एकूण १०२ एकरवर मेट्रो कारशेडचं बांधकाम जोरदारपणे सुरू झालं आहे. यावरून डीपीआयआयटीनं ठाकरे सरकारला पत्र पाठवून बांधकाम तांबडतोड थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरात केडरचे अधिकारी असलेले गुरुप्रसाद मोहापात्रा डीपीआयआयटी विभागाचे प्रमुख आहेत. जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचं प्रचंड नुकसान झालं आहे. केंद्र सरकारच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, अशी मी विनंती करतो,’ असं मोहापात्रांनी पत्रात म्हटलं आहे.

मोदी सरकारने कांजूरमार्गमधील एकूण १०२ एकर जागेवर दावा सांगितला असताना ठाकरे सरकारनंदेखील तोडीसतोड आक्रमक पवित्रा घेतल्याचं समजतं आहे. कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ‘मुंबई मिरर’ला अधिकृतपणे दिली. ‘केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला पूर्णपणे कल्पना आहे. परंतु ती जागा मुळात केंद्राच्या मालकीचीच नाही, तर पूर्णपणे राज्य सरकारच्या मालकीची आहे,’ असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी देखील ठासून सांगितलं. मात्र यावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी पूर्ण नकार दिला.

 

News English Summary: The Thackeray government had a few days back made an official announcement and decided to shift the Metro car shed on paper from Aarey to Kanjurmarg, after which the state government was lauded by all quarters. After this decision, many allegations were leveled between the BJP and the Thackeray government in the state. However, the Modi government at the Center has obstructed this.

News English Title: Modi government has sends stop notice car shed Kanjurmarg site News updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x