25 April 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

लोकशाहीचं रक्षण करा | लोकशाहीला कधीही गृहित धरु नका - अमृता फडणवीस

मुंबई, १० नोव्हेंबर: अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विराजमान होणार आहेत. २० जानेवारी २०२० रोजी ते अधिकृतपणे व्हाईट हाऊसची सूत्र हाती घेतील. याच निवडणुकीत दुसऱ्याबाजूला अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचा मान एका महिलेला मिळण्याचा इतिहास भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी देखील रचला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यासंदर्भातील एका व्हिडिओला रिट्विट केलं आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात फडणवीस सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अमृता फडणवीस संधी मिळताच राज्यातील सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लक्ष करत असतात. त्या थेट राजकारणात नसल्या तरी त्यांची जवळपास सर्वच ट्विट राजकारणाशी संबंधित असतात. त्यात फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेल्यापासून भाजप पेक्षा अमृता फडणवीस यांनाच अधिक त्रास होतं असल्याचं समोर आलं आहे. अगदी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात, कंगना रानौत ते अर्णब गोस्वामी पर्यंत अशा सगळ्याच विषयात त्या राज्य सरकारला लक्ष करण्यासाठी अगदी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेताना देखील दिसल्या आहेत. आता तर त्यांनी थेट अमेरिकेतील निवडणुकांसंदर्भात भाष्य केलं आहे. कमला हॅरिस यांच्या विजयानंतर त्यांनी त्याच्या भाषणाचा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

अमृता फडणवीस यांनी व्हिडिओ रिट्विट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे. ‘अगदी खरं आहे. लोकशाही ही एक स्थिती नसून ती कृती आहे. याचाच अर्थ असा की देशातील लोकशाहीची खात्री देता येत नाही. ही तितकीच मजबूत आहे जितकी त्यासाठी आपली लढण्याची इच्छा. म्हणूनच त्याचं रक्षण करा आणि लोकशाहीला कधीही गृहित धरु नका,’ असं सूचक ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

 

News English Summary: Joe Biden of the Democratic Party will be the next president of the United States. He will officially take over the White House on January 20, 2020. In the same election, Kamala Harris of Indian descent has also made history by getting the honor of a woman vice-president of the United States. Amrita Fadnavis, wife of Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis, has retweeted a video in this regard.

News English Title: Amruta Fadnavis retwit video of Kamala Harris over democracy news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x