29 March 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

३ वाजेपर्यंत १ कोटी मतमोजणी पूर्ण | अजून ३ कोटी १६ लाख मतमोजणी शिल्लक

Bihar Assembly Election 2020, Vote counting

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.

तर दुसरीकडे महाआघाडीने एकूण १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी ६७ जागांवर राष्ट्रीय जनता दल, २० जागांवर काँग्रेस आणि डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुजन समाज पार्टीला दोन जागांवर, MIM’ला दोन जागांवर तर एलजेपी आणि इतर यांना चार जागांवर आघाडी मिळाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार आत्ता तरी एनडीएला आघाडी मिळते आहे असंच दिसतं आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल हाती येण्यासाठी आजची रात्र उजाडणार आहे. निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु असेल अशी माहिती दिली आहे.

त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार हे स्पष्ट झालं आहे. EVM’च्या संख्येत ६३ टक्के वाढ झाली असल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु असेल,” अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. बिहारमध्ये ३ टप्प्यात ४ कोटी १६ लाख लोकांनी मतदान केलं असून दुपारी तीन वाजेपर्यंत एक कोटी मतमोजणी झाली असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

 

News English Summary: It has become clear that the counting of votes for the Bihar Assembly elections will take longer than usual. The counting of votes will start till late at night as the number of EVMs has increased by 63 per cent, the Election Commission has said. In Bihar, 4 crore 16 lakh people have cast their votes in three phases and one crore votes have been counted till 3 pm, according to the Election Commission.

News English Title: Bihar Assembly Election 2020 total vote counting reached to one crore till 3 O clock news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x