29 March 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

याला कोर्टाचा अवमान म्हणू नका | त्याला भविष्यातील राज्यसभेच्या सीटचा अवमान म्हणा - कुणाल कामरा

Kunal Kamra, Arnab Goswami, Supreme court

मुंबई, १३ नोव्हेंबर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत भर पडली असून अवमान खटला दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी त्यास मान्यता दिली आहे. यानंतर कुणाल कामरा याने ट्विट करत आपली बाजू मांडली असून पुन्हा एकदा उपहासात्मकपणे टीका केली आहे. त्याने ना वकील, ना माफी, ना दंड अशी कॅप्शन दिली आहे.

“मी केलेलं ट्विट सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत असल्याचं आढळलं आहे. मी जे ट्विट केलं होतं ते माझं सर्वोच्च न्यायालयाने प्राइम टाइम लाऊडस्पीकरविरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयावरील मत होतं,” असं कुणाल कामराने म्हटलं आहे. कुणाल कामराने यावेळी माफी मागण्यास नकार दिला असून, “माझं मत अद्याप देखील तेच असून इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने बाळगलेलं मौन टीका न करता दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही,” असं म्हटलं आहे. कुणाल कामराने यावेळी आपल्यावरील खटल्याचा वेळ माझ्याइतकं महत्त्व आणि संधी न मिळालेल्या इतर महत्वाच्या प्रकरणांना द्यावा असंही म्हटलं आहे. यावेळी त्याने काही प्रकरणांचा उल्लेखही केला आहे. “माझी वेळ इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना दिली तर आभाळ कोसळेल का?,” असंही कुणाल कामराने विचारलं आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने अद्याप माझ्या ट्विटसंबंधी काही जाहीर केलेलं नाही. पण जेव्हा कधी करतील तेव्हा ते हसतील,” अशी आशा कुणाल कामराने व्यक्त केली आहे. यावेळी कुणाल कामराने आपण एका ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयात महात्मा गांधींच्या ऐवजी हरिश साळवे यांचा फोटो लावावा अशी मागणी केल्याची आठवण करुन देत पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.

 

News English Summary: Republic TV editor and journalist Arnab Goswami’s tweet after the Supreme Court granted him bail has added to the woes of stand-up comedian Kunal Kamra and allowed him to file a contempt case. It has been approved by Attorney General KK Venugopal. After this, Kunal Kamra defended himself by tweeting and once again criticized sarcastically. He has given no caption like lawyer, no apology, no penalty.

News English Title: Kunal Kamra again twit on Arnab Goswami and Supreme court case matter news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x