25 April 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल | आणि किंमत....

India citizens, Coronavirus Vaccine, Sirum Institute, CEO Adar Poonawalla

मुंबई, २० नोव्हेंबर: कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस (Coronavirus Vaccine) बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Sirum Institute CEO Adar Poonawalla) यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं पूनावाला यांनी सांगितले.

“एप्रिल आणि मे महिन्यात कोणीही विचार केला नव्हता की करोनावरील लस ही इतक्या लवकर बाजारात येईल. आतापर्यंत या लसीनं ज्येष्ठ नागरिकांवरही उत्तम परिणाम दाखवले आहेत. ज्या प्रकारे मॉडर्ना आणि फायझरच्या लसी महागड्या आहेत आणि त्यांच्या साठवणुकीचा मुख्य प्रश्न आहे, मात्र या लसीपासून आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू हा मुख्य प्रश्न आहे. आतापर्यंत या लसींचे परिणाम उत्तम आहेत,” असं पूनावाला म्हणाले. ‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट २०२०’ या कार्यक्रमात बोलताना पूनावाला यांनी ही माहिती दिली. या लसींमुळे आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू याचं उत्तर वेळच देईल. सध्या याबाबत कोणतंही आश्वासन देता येणार नाही. याबाबत आपण केवळ दावा आणि अंदाज बांधू शकत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

 

News English Summary: Efforts are underway to find a vaccine against corona worldwide to control the corona epidemic. Adar Poonawala, chief executive officer of Serum Institute of India, a company that manufactures corona vaccines, told the public on Thursday. The coronavirus vaccine will be available to health workers and senior citizens by February 2021, while the coronavirus vaccine is likely to be available to the general public by April 2021, Poonawala said.

News English Title: India citizens will get Coronavirus Vaccine by April 2021 says Sirum Institute CEO Adar Poonawalla news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x