20 April 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अक्षयने ट्विटर वरून भाजपच्या अडचणी 'डिलीट' केल्या

नवी दिल्ली : अक्षय कुमारने त्याची २०१२ मधील एक ट्विट डिलीट केल्याने त्याला नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले आहे. कारण २७ फेब्रुवारी २०१२ मधील त्या ट्विट मध्ये अक्षय कुमारने कॉग्रेसच्या काळातील वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर केलं होतं. सध्या मोदी सरकार असताना देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला असताना नेटिझन्सने अक्षय कुमारला चांगलाच धारेवर धरलं आहे.

अक्षय कुमारची एकूणच २ – ३ वर्षांची वाटचाल बघता त्याची भाजप बरोबर जवळीक जास्तच वाढली होती. इतकंच नाही तर मध्यंतरी राज्यसभेवर जेंव्हा भाजपच्या कोट्यातील खासदार निवंडून आणायचे होते त्यात अक्षय कुमारचा नाव अग्रस्थानी होत. परंतु त्या राज्यसभा निवडणुकीच्या २-३ दिवस आधी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा झाली आणि भाजपच्या सर्व खेळावर पाणी फिरवलं.

२०१२ मध्ये म्हणजे यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत असताना काँग्रेसला लक्ष करत एक ट्विट केलं होत. तेच ट्विट नेटिझन्सनी बाहेर काढलं आणि मोदी सरकारच्या काळातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीची आठवण करून दिली आहे. परंतु नेटिझन्सनी अक्षय कुमारला ट्रोल करताच अक्षय कुमारला भाजपला अडचणीत आणणाऱ्या ट्विटची आठवण झाली आणि त्याने गुपचूप ते ट्विट डिलीट करून टाकलं आहे.

६ वर्ष जुन्या म्हणजे २७ फेब्रुवारी २०१२ मधील त्या ट्विट मध्ये काय म्हणाला होता अक्षय कुमार नक्की;

अक्षय ने ट्विट केलेलं की,’पेट्रोलची किंमत ज्या प्रकारे वाढतेय, त्यावरून मला वाटतंय की आता आपल्याला धूळखात पडलेली सायकल साफ करून रस्त्यावर उतरवावी लागणार आहे. असं म्हणत त्याने यूपीएच्या काळातील वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीवर टीका केली होती. परंतु मोदींच्या काळातील हे दर लवकरच १०० रुपायाची सीमा गाठतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. तरी सुद्धा अक्षय कुमारला त्याची काहीच कल्पना नसावी असं तर होणार नाही. अर्थात माहित असेल तरी सध्या मोदी सरकार सत्तेत आहे, त्यामुळे असं ट्विट करण त्याच्या फायद्यांच नसावं. एवढंच नाही तर मोदी सरकार त्या जुन्या ट्विट मुले अडचणीत येऊ नये म्हणून त्याने लगेचच ते डिलीट करून भाजपासाठी असलेली तत्परता दाखवून दिली आहे.

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(13)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x