19 April 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग | पण श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार

Shivsena, slams BJP, Mumbai Municipal corporation election 2020

मुंबई, २१ नोव्हेंबर: भारत-चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे, अशीच परिस्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर प्रामुख्याने काश्मीरमध्ये आहे. यावेळी भारताने पाकिस्तानप्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला आहे. दरम्यान भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते.

देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? अशी टीका शिवसेनेने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर केली आहे. अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार? ते स्पष्ट केले पाहिजे.

डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय? चिनी सैन्याने हिंदुस्थानच्या हद्दीत लडाखमध्ये घुसखोरी केली. चिनी सैन्य जे आत घुसले ते मागे जायला तयार नाही.

मागे हटण्यासंदर्भात दोन देशांतील सैन्य अधिकाऱ्यांत चर्चा, वाटाघाटी सुरू आहेत. चिनी आमच्या जमिनीवर घुसले आहेत, पण चर्चा, वाटाघाटीचा मार्ग आपण स्वीकारला हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. जमीन आमची व ताबा चिनी सैन्याचा, पण चीनचे नाव घेऊन आमच्या पंतप्रधानांनी, संरक्षणमंत्र्यांनी, भारतीय जनता पक्षातील पुढाऱ्यांनी दम भरल्याचे चित्र दिसत नाही.

 

News English Summary: Meanwhile, three Indian soldiers were killed in an encounter on the Indo-Pak border, two of whom were found dead in Maharashtra. What were the Bharatiya Janata Party leaders in Maharashtra doing when the coffins reached the village? He was demanding Chhath Puja in Mumbai. Some of them were blowing conch shells to open temples, open temples, while some were chanting inspirational speeches to bring down saffron on Mumbai Municipal Corporation.

News English Title: Shivsena slams BJP over Mumbai Municipal corporation election 2020 news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x