25 April 2024 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला
x

आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी - मनसेचं टीकास्त्र

MNS leader Sandeep Deshpande, CM Uddhav Thackeray, Video conference

मुंबई, २३ नोव्हेंबर: दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी काल संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, करोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच त्यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, “मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी”.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी का रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. वाढीव विजबीलासारखा ऐरणीवर असलेल्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणं टाळलं, असं देशपांडे म्हणाले आहेत.

कोरोनाने संकट टळलेलं नाही असं सांगतानाच इतर राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील लोकांनीही शिस्त पाळली पाहिजे नाहीतर आपल्यालाही कडक पावले उचलावी लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या संकेतावर बोलताना ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडलेली आहे त्याचा उद्रेक होवू नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, असं देशपांडे म्हणाले.

 

News English Summary: MNS has strongly criticized the Chief Minister’s statement. Maharashtra Navnirman Sena general secretary Sandeep Deshpande has said that it was expected that the Chief Minister would speak on unemployment and electricity bills but nothing happened. He also tweeted, “Yesterday’s speech did not disappoint as there was no expectation from the Chief Minister. Your Chief Minister, your luck, your misfortune, your responsibility

News English Title: MNS leader Sandeep Deshpande criticized CM Uddhav Thackeray after his video conference news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x