29 March 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

भाजपाला खिंडार | माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

BJP former MP Jaysinghrao Gaikwad, joined NCP party

औरंगाबाद, २४ नोव्हेंबर: उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला होता आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.

मराठवाड्यातील मोठं राजकीय प्रस्त असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे संघाच्या मुशीतून घडलेले जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. बीड लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल ३ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. महत्वाचं म्हणजे त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसंच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. अगदी काही दिवसांपर्यंत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य देखील होते. परंतु, त्यांनी भाजपाला कंटाळून अखेर राजीनामा दिला होता.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले जयसिंगराव गायकवाड यांनी अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं (Former MP Jaysinghrao GaikawadJoins NCP Party) आहे, त्यामुळे पंकजा मुंडेच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने सुरुंग लावल्याचं बोललं जात आहे, भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी केला. जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचंही त्यांनी सांगितले.

यावेळी जयसिंगराव गायकवाड म्हणाले की, महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असं म्हणाले तर महाराष्ट्रात ३० वर्षे बीड जिल्हा बघतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा हे कळते. जयसिंगराव गायकवाड जिथे गेले होते तिथे त्यांचं मन रमलं नाही. देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलं. त्यांचे पक्षात स्वागत आहे अशा शब्दात शरद पवारांनी जयसिंगराव गायकवाड यांचे कौतुक केले.

 

News English Summary: Former MP Jaysingrao Gaikwad said that by supporting Satish Chavan of Mahavikas Aghadi, he will get a record breaking vote. I will fulfill the responsibility given to me honestly. If we say that now there will be only NCP, then we have been looking at Beed district in Maharashtra for 30 years. A good colleague has come to you. Learn how to set an example in public life. He did not like where Jaysingrao Gaikwad had gone. He will be the only MP in the country who has never been home. So kept walking around the constituency. He continued to share in the joys and sorrows of the common man. He said that power should be maintained humbly. Welcoming his party, Sharad Pawar praised Jaysingrao Gaikwad.

News English Title: BJP former MP Jaysinghrao Gaikwad joined NCP party News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x