26 April 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पालघर प्रचारातील युतीचा कलगीतुरा अगदी २०१४ प्रमाणे?

पालघर : सत्तेतीलच दोन वाटेकरी पक्ष पालघर निवडणुकीतील प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय काल शिवसेनेच्या प्रचारादरम्यान आला आहे. कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही ऑडिओ क्लिप असल्याने सर्वत्रच त्याची चर्चा झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड भेद रणनितीनुसार चालण्याचे आवाहन करत आहेत. भाजपला ही प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल तसेच विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे असे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सांगत आहेत.

पुढे त्या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस असं बोलत आहेत की, आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकतीने खंबीरपणे उभा आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाने हे सर्व आरोप फेटाळले असून त्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचे म्हटले आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघरमध्ये २ सभा होत आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या या आरोपांना मुख्यमंत्री जशास तसे उत्तर देतील असं म्हटलं जात आहे. कालच भाजपचे लोक पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता आणि काही लोकांना
ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होत.

परंतु सत्तेतील हे दोन वाटेकरी असलेले पक्ष सामान्य जनतेला पुन्हां २०१४ मधील त्याच प्रचार तंत्राची आठवण करून देत आहेत. शिवसेना – भाजप एकमेकांवर विकोपाला जाऊन टीका करतील आणि नंतर सत्तेत एकत्र नांदतील. कालांतराने दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल होताना दिसेल जसं २०१४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्यय आला होता.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x