25 April 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

गाडीवर FASTag नाही | दुप्पट टोल भरायचाही नाही | काय आहे दुसरा पर्याय?

No need to pay, double toll, Without FasTag

नवी दिल्ली, २ डिसेंबर: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza FASTag ) डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital IT Payment system) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक (FASTag notification released) काढलं आहे. फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे (Without FASTag Double Toll Charge) वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. मात्र आता यामध्ये एक अपडेट आलं आहे.

फास्टॅग न लावणाऱ्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल कर वसूल करण्याची सरकारची योजना होती. मात्र एका विशेष सेवेचा वापर करून, फास्टॅग नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचता येतं. जर फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा (Prepaid touch & go card service) वापरावी लागेल. जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स (PoS) कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता आणि फास्टॅग ऐवजी हे कार्ड वापरल्यास टोल दुप्पट होणार नाही.

फास्टॅग कसा काढायचा?

  • फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे.
  • या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल.
  • बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे.
  • Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही फास्टॅग काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?

  • जर तुम्ही फास्टॅग बँक खात्यासोबत लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही.
  • तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल.
  • फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता.

एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही. दोन गाड्या असल्यास दोन वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: The central government has taken a big decision. FASTag has been made mandatory for all four-wheelers from 1 January 2021. The Ministry of Road Transport and Highways (MoRTH) has decided to launch Digital and IT Payment System at Toll Plaza FASTags across the country. Therefore, from January 1, it is mandatory to fastag even old vehicles. The Union Ministry of Road Transport and Highways has issued a circular (FASTag notification) in this regard. A notification has been issued to recover Double Toll Without FASTag (FASTag Double Toll Charge). But now there is an update.

News English Title: No need to pay double toll even without FasTag learn new service News updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x