19 April 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

कृषी कायद्याला तीव्र विरोध | प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

Former CM of Panjab, Prakash singh Badal, Returns his Padma Vibhushan award, Farmer protest

नवी दिल्ली, ३ डिसेंबर: केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Former Chief Minister of Punjab Prakash Singh Badal) यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण (Return his Padma Vibhushan Award) हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President of India Ramnath Kovind) यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला.

आपला पद्मविभूषण सन्मान परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (Returning his Padma Vibhushan, former Punjab Chief Minister Parkash Singh Badal said) म्हणाले, ‘मी इतका गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात काहीच फायदा नाही.’ शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आदोलनाला ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे ते अतिशय दु:खद असल्याचे बादल यांनी म्हटले आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

  • तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घेण्यात यावे.
  • शेतकऱ्यांसाठी एमएसपीला कायदेशीर मान्यता देण्यात यावी.
  • एमएसपी लागू करण्यासाठी स्वामीनाथन फॉर्म्युला लागू करण्यात यावा.
  • एनसीआर विभागात वायू प्रदुषण कायद्यातील बदल मागे घेण्यात यावे.
  • शेतीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात यावी.
  • देशभरात शेतकरी नेते, कवी, वकिल आणि अन्य कार्यकर्त्यांवर जे खटले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत.

 

News English Summary: The agitation of farmers in the country against the Central Agricultural Act is now taking a more violent form. Meanwhile, former Punjab Chief Minister Prakash Singh Badal has returned his Padma Vibhushan Award in protest of the law. Badal wrote a three-page letter to President Ramnath Kovind condemning the Union Agriculture Act and returning the Padma Vibhushan, expressing displeasure over the action being taken against farmers.

News English Title: Former CM of Panjab Prakash singh Badal returns his Padma Vibhushan award amid farmer protest against farm law News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x