20 April 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अन्वय नाईक प्रकरण CBI'कडे देण्यासाठी अर्णब गोस्वामींची धडपड | हायकोर्टात अर्ज

Anvay Naik suicide case, Republic TV Chief editor Arnab Goswami, Files two applications, Mumbai high court

मुंबई, ३ डिसेंबर: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami, editor of Republic TV) यांनी आज मुंबई हायकोर्टात दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले (Filed two important petitions in the Mumbai High Court today in connection with the Naik suicide case) आहेत. आरोपपत्राची प्रक्रिया तसेच तपास हस्तांतरित करण्याबाबत हे अर्ज आहेत.

तत्पूर्वी अर्णब यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तिथे सुनावणी होऊन अर्णब यांना जामीन मंजूर झाला आणि त्याचदिवशी तळोजा कारागृहातून त्यांना मुक्तही करण्यात आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्णब यांनी आज दोन महत्त्वाचे अर्ज मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह पुढील संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती अर्णब यांच्या एका अर्जात करण्यात आली आहे तर अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) वर्ग करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती अर्णब यांच्या दुसऱ्या अर्जात करण्यात आली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब व अन्य दोन जणांवर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ आणि ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करावा, अशी अर्णब गोस्वामी यांची विनंती आहे.

 

News English Summary: Arnab Goswami, editor of Republic TV, filed two important petitions in the Mumbai High Court today in connection with the Naik suicide case in connection with the Naik suicide case. Are. These are applications related to the process of charge sheet as well as transfer of investigation.

News English Title: Anvay Naik suicide case republic TV Chief editor Arnab Goswami files two application before Mumbai high court News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x