20 April 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मुंबई चांगली जीवनशैली जगण्याची संधी देते | IIT सर्वेक्षण | ट्विटर क्वीनही तोंडघशी

Mumbai city, best opportunity, better life, IIT Mumbai survey

मुंबई, ६ डिसेंबर: मागील काही महिन्यांपासून कंगना रानौतने व्यक्तिगत विषयावरून मुंबई शहराची अत्यंत वाईट प्रकारे बदनामी केली. अगदी कळस म्हणजे तिने मुंबईला थेट PoK म्हटल्याचं देखील देशाने पाहिलं आणि मुंबईत कसे अत्याचार होतात याचा कपोकल्पित पाढे वाचताना मुंबई पोलिसांना देखील तिने माफिया म्हटल्याने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक मुंबई शहर आजची देशातील कोणत्याही शहरांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित आहे हे सर्वश्रुत आहे आणि इथल्या लोकांनादेखील चांगली जीवनशैली जगण्याची संधी मिळते याला सर्वेक्षणातून देखील दुजोरा मिळाला आहे.

मुंबई IIT’ने या संदर्भात देशभरातील शहरांचं सर्वेक्षण (Mumbai IIT survey) केला आहे आणि त्यात मुंबई अव्वल ठरली आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि प्रत्येकाला जगविणारी, अशी मुंबई शहराची ओळख आहे. आता जीवनशैलीचा दर्जादेखील मुंबईत चांगला टिकून असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई शहर चांगली जीवनशैली जगण्याची संधी देते (Mumbai offers a chance to live a good lifestyle says Mumbai IIT survey), असे सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

IIT मुंबईने शहरांतील जीवनशैलीच्या दर्जाचा अभ्यास केला. याद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पटना, जयपूर, इंदौर, भोपाळ, लखनऊ अशा अनेक शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवन जगण्याचा दर्जा बऱ्यापैकी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला. पायाभूत सेवासुविधा, आर्थिक विकास, सुरक्षा, प्रवास, पर्यावरण, सर्वसाधारण सेवा, अशा अनेक बाबीत मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई ही शहरे आघाडीवर आहेत. तर याच प्रवर्गात पटना, इंदौर, लखनऊ ही शहरे खालच्या स्तरावर आहेत. आर्थिक विकासाबाबत मुंबई पसंतीस उतरली असून, पटना या शहरात परंतु अनेक घटकांचा अभाव असल्याचे सर्वेक्षण सांगते. मुंबई आणि इतर शहरांच्या पायाभूत सेवासुविधांप्रमाणेच महिला सक्षमीकरण, गुन्हे आदींचीही माहिती घेण्यात आली आहे. सदर सर्वेक्षणानुसार, जयपूरमध्ये महिलांविषयक गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. चेन्नईत ते कमी आहे (According to the survey, Jaipur has the highest crime rate among women. It is less in Chennai).

 

News English Summary: Mumbai IIT has surveyed cities across the country in this regard and Mumbai has topped the list. The city of Mumbai is known as the financial capital of the country and the lifeblood of everyone. According to a survey, the standard of living in Mumbai is now good. The survey clearly states that the city of Mumbai offers a chance to live a good lifestyle. IIT Mumbai studied the quality of life in cities. It was claimed that the standard of living in Mumbai is much better than many cities like Delhi, Kolkata, Chennai, Patna, Jaipur, Indore, Bhopal, Lucknow.

News English Title: Mumbai city gives best opportunity for better life here IIT Mumbai survey news updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x