29 March 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शेतकरी आंदोलन | शरद पवार, राहुल गांधींसहीत ५ दिग्गज नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार

Farm Laws, farmer protest, joint delegation of opposition, Meet President Ramnath Kovind

नवी दिल्ली, 08 डिसेंबर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारवरचा दबाव वाढतो आहे. हा दबाव वाढविण्यासाठी विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार (NCP President Sharad Pawar), काँग्रेसकडून राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi), CPI (M)चे सीताराम येचुरी, CPIचे डी राजा आणि DMKचे टीकेएस एलनगोवन यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलमुळे फक्त 5 नेत्यांनाच भेटीची परवानगी मिळाली आहे. शरद पवार यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. या प्रश्नावर सर्व पक्ष मिळून भूमिका ठरविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.

CPI (M) नेते सीताराम येचुरी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार (According to CPI (M) leader Sitaram Yechury’s briefing to the media) राष्ट्रपतींसोबत होणारी ही भेट कृषी कायद्यांसंदर्भात असणार आहे. मागील १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत (Farmers have been protesting on the Delhi border for the last 13 days) आहेत. कृषी कायदे रद्द करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांनी भारत बंदचीही हाक दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. आता उद्या राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, ‘भारत बंद’ आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण गृहमंत्री अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे.

 

News English Summary: The pressure on the central government is increasing on the issue of farmers. To increase the pressure, a delegation of opposition parties will meet President Ramnath Kovind. The delegation includes NCP President Sharad Pawar, Congress leader Rahul Gandhi, CPI (M) ‘s Sitaram Yechury, CPI’ s D Raja and DMK ‘s TKS Elangovan. Only 5 leaders have been allowed to visit due to the Kovid protocol. Sharad Pawar also informed about this in the press conference held today.

News English Title: Farm Laws farmer protest joint delegation of opposition parties will meet President Ramnath Kovind tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x