20 April 2024 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

कोरोना आपत्ती | सतराशे-साठ अँप | भारतीयांच्या लसीकरणाचा डेटा घेण्यासाठी सुद्धा अँप

Union health ministry, develop mobile application, corona vaccine registration

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोना लशीच्या डिलीव्हरीचा रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन (Mobile Application For Corona Vaccine) तयार केलं आहे. त्याशिवाय एक डिजीटल प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून डेटा रेकॉर्ड (Data Record) ठेवला जाऊ शकतो. तसेच, लोक स्वत: कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतील (Mobile Application For Corona Vaccine).

आरोग्य सचिव (Health Secretary) राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. को-व्हिन डिजीटल प्लॅटफॉर्मवर पूर्ण लसीकरण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. रिपोर्ट मॉड्यूलमध्ये किती लस सेक्शन आयोजित केले गेले, किती लोक यात सहभागी झाले, किती लोक बाहेर पडले याप्रकारचा अहवाल यात तयार करण्यात येईल, असंही राजेश भूषणने सांगितलं.

रजिस्ट्रेशन मॉड्यूल हे लोकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी आहे. हे स्थानिक अधिकारी किंवा सर्वेक्षणकर्त्यांद्वारे प्रदान केलेल्या को-मॉर्बिडिटीवर बल्क डेटा अपलोड करेल (Mobile Application For Corona Vaccine). लसीकरण मॉड्यूल बेनिफीशिअरी डेटाला अपडेट करेल आणि लसीकरणाच्या स्थितीला अपडेट करेल. बेनिफीशिअरी अ‍ॅकनॉलेजमेंट मॉड्यूल लाभार्थ्यांना एसएमएस पाठवेल आणि एका लसीकरणानंतर क्युआर आधारित प्रमाणपत्रही देईल.

दरम्यान, कोविड १९ लस लवकरच उपलब्ध होण्याची आशा असून लशीकरणाच्या मोहिमेत मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये बोलताना व्यक्त केली होती. पुढे त्यांनी सांगितले की, फाइव्ह जी मोबाइल सेवा ठरावीक कालमर्यादेत भारतात उपलब्ध होईल. त्यामुळे डेटा म्हणजे माहितीचा वेग वाढणार आहे. अनेक जीबी क्षमतेपर्यंत माहितीची देवाणघेवाण वेगाने करणे शक्य होणार आहे.

वास्तविक १५ जुलै रोजी रिलायन्स फाउंडेशन आणि कोरोना वॅक्सिंच्या संदर्भात नीता अंबानी यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. नीता अंबानी म्हणाल्या होत्या की कोरोनाव्हायरस लस जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा देशातील प्रत्येक कोप-यात पोहोचली जाईल याची कंपनी खात्री करेल. रिलायन्स फाऊंडेशन, जिओच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने भारतभरात जलद मेगा-स्केल सीओव्हीआयडी चाचणीसाठी सरकार आणि स्थानिक नगरपालिकांशी भागीदारी करण्यास तयार आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. परिणामी देशभरातील आरोग्य व्यवस्थेच्या संबंधित डेटा खाजगी कंपन्यांच्या हाती तर लागणार नाही ना अशी शंका सायबर तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण सरकारने कोरोना आपत्तीत एकंच सेंट्रिक अँप न बनावता प्रत्येक विषयावरुन निरनिराळे अँप बनविण्याचा सपाटा लावला आहे. कारण डेटा हिच भविष्यातील संपत्ती समजली जाते.

 

News English Summary: The Union Ministry of Health has developed a Mobile Application For Corona Vaccine for real time monitoring of corona vaccine delivery. A digital platform has also been developed. Data records can be kept through this. Also, people can register for the corona vaccine themselves

News English Title: Union health ministry develop mobile application for corona vaccine registration news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x