29 March 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार?
x

भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घ्या, इव्हीएमसोबत छेडछाड: प्रफुल्ल पटेल

भंडारा-गोंदिया: जगभरातील अनेक देशांनी विशेष करून युरोपिअन देशांमध्ये संबंधित निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर सुरु केला होता. परंतु कालांतराने इव्हीएममधील त्रुटी समोर आल्या आणि त्यांनी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरु केला होता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून ६ विधानसभा क्षेत्रातील ६४ केंद्रांवर मतदान थांबले होते. त्यातील तब्बल ३४ ठिकाणी मतदान रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला सांगण्यात आले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भंडारा-गोंदियामधील जास्त उन्हामुळे इव्हीएमचे सेन्सर्स बंद पडले आहेत. परंतु इतर मशीनच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं तर तर परिस्थिती अजूनच बिघडेल असं प्रफुल्ल पटेल म्हणाले असून सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी व्हावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सध्याची मतदान प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरु आहे ती रद्द करण्यात यावी. या इव्हीएमवर आम्हाला भरवसा नाही. कारण, या इव्हीएम मशिन्स सुरतवरून आणल्याने त्या व्यवस्थित आहेत की नाही याबाबत आम्हाला शंका आहे, असेही पटेल यावेळी म्हणाले.रफुल्ल पटेल म्हणाले.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x