19 April 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येतंय | ध्वनी प्रदूषनावरून ऑनलाईन याचिका दाखल

Online Petition Filed, Amruta Fadnavis, news song, Protect noise pollution

मुंबई, १५ डिसेंबर: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं टॅलेंट देशाने पाहिलं आहे. अगदी थेट अमिताभ बच्चन पर्यंतच्या कलाकारांना त्यांच्या गाण्याच्या अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. कॅसेट कंपन्यांना सध्या भावलेला तो एकच आवाज असावा असं सध्या इतर गायकांना वाटू लागलं आहे. सारेगमपा लिटिल चॅम्प मधील गायक सध्या लग्नाच्या वयाचे झाले तरी त्यांच्यातील एखाद्याचा अपवाद वगळता इतर टॅलेंटला अजून संधी मिळालेली नसल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे अमृता फडणवीस यांच्या टॅलेंटला सध्या देशभरातून मागणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एकावर एक एल्बम येतंच आहे. त्यामुळे अनेकजण सध्या त्यांच्या गायकीवर खवळल्याचं पाहायला मिळालं आहे आणि ते थांबता थांबत नाही.

अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी मी गायलेलं एक गाणं प्रदर्शित होत असून हे गाणं एका सस्पेन्स चित्रपटातील आहे असं सांगितलं. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहन देखील अमृता यांनी केलं. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केलं आहे.

चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर (Online petition filed on Change.org agaist Amruta Fadnavis song to protect noise pollution) हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी ‘पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये अमृता यांचा उल्लेख मामी असाही करण्यात आलाय. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे,” असं या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे, “आपला कान, आपली जबाबदारी” असंही लिहिण्यात आलं आहे.

 

News English Summary: On Monday (December 14, 2020), a user named Hunmant Dhome on the website Change.org filed an online petition saying, “Amrita Fadnavis should not sing to protect the environment and prevent noise pollution.” In the disposition of this online petition, Amrita is also mentioned as Mami. “Mami’s new song is coming next Thursday. Noise pollution caused by this song can be dangerous to man. We need to sign a petition to stop them from releasing this song, ”the petition said in a statement. It also reads, “Your ear, your responsibility.”

News English Title: Online Petition Filed against Amruta Fadnavis news song to protect noise pollution news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x