29 March 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

कृषी कायदे | रोजच्या सवयीप्रमाणे आजही मोदींनी असत्याग्रहच केला - राहुल गांधी

Congress leader Rahul Gandhi, PM Narendra Modi, New farm bills

नवी दिल्ली, १८ डिसेंबर: केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं जोरदार समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. (Prime Minister Narendra Modi on new agricultural law)

शेतकऱ्यांना फक्त आडतीमध्ये बांधून मागील सरकारनं जे पाप केलं, त्याचं प्रायश्चित म्हणजे हे कृषी कायदे असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केलाय. देशात कृषी कायदे लागू होऊन 6 महिने लोटले पण देशातील एकही मार्केट कमिटी बंद झालेली नाही. मग विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचं काम का सुरु आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केलाय.

“जे लोक जाहीरनाम्यात कृषी कायद्यांची वकिली करत होते. त्यांनी आजवर हे कायदे लागू केले नाहीत”, असं मोदी म्हणाले. विरोधी पक्षाच्या याआधीचे जाहीरनामे आणि कृषी क्षेत्र सांभाळण्यांनी लिहिलेली पत्र वाचली तर लक्षात येईल आज कृषी कायद्यांमध्ये असलेल्या तरतूदी लागू करण्याची शिफारस केलेली पाहायला मिळेल. पण आज मोदी हे सगळं लागू करत असल्यानं विरोधकांना पोटदुखी होतेय, असा निशाणा पंतप्रधानांनी साधला.

दरम्यान, मोदींच्या या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “रोजच्या सवयीप्रमाणे आजही मोदींनी असत्याग्रहच केला, शेतकऱ्यांचं ऐका आणि कृषी कायदे रद्द करा”.

 

News English Summary: After Modi’s speech, Congress leader Rahul Gandhi has also lashed out at Prime Minister Narendra Modi. In this regard, while tweeting, Rahul Gandhi has said, “Even today, as usual, Modi has resorted to lies. Listen to the farmers and repeal the agricultural laws.”

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticized Prime Minister Narendra Modi over new farm bills news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x