20 April 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

SSC-HSC Exam Result | दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या

State Board, SSC and HSC Board, Exam result

मुंबई, २२ डिसेंबर: महाराष्ट्र राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

दुसरकडे SSC’च्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.

जाहीर झाल्याप्रमाणे २३ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत मुदत आहे. पुनर्परिक्षार्थींसाठी १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. www. Mahahsscborad.in वर दाखल करायचे अर्ज भरू शकतात.

त्याचप्रमाणे आज दहावीच्या मार्कशीटबाबत गुडन्यूज देण्यात आली. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना मार्कशीट घरपोच देण्याची सोय परीक्षा मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची मार्कशीट घरीच मिळणार आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीला यापुढे चार वेळा ऑनलाईन मार्कशीट मागविता येणार आहे. hhtp://kseeb.kar.nic.in या संकेत स्थळावरून आपले गुणपत्रक मागवता येणार आहे. सरकारी कामांसह नोकरी मिळविण्यासाठी दहावीची मार्कशीट गरजेची असते तर ही मार्कशीट वेळेत न मिळाल्याने अनेकांची कामे अडून राहतात. परंतु यापुढे मार्कशीट ऑनलाईन मिळवता येणार असल्याने अनेकांचा त्रास कमी होणार आहे.

 

News English Summary: The results of the 10th and 12th supplementary examinations conducted by the Maharashtra State Board in November and December will be announced online on Wednesday (December 23) at 1 pm. Students can view the results through the website www.mahresult.nic.in. Presented by Ashok Bhosale through a press release.

News English Title: State Board of SSC HSC result will declare on tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x