29 March 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

Effects of Over Spicy Food Eating | अति तिखट पदार्थ खाता | मग तुम्ही हे नक्की वाचा

Over spicy food eating effect

मुंबई, २४ सप्टेंबर | रोजच्या खाद्य सवयीमध्ये अनेकांना तिखट, झणझणीत जेवण जेवायची सवय असते. जेवणात जरा तरी तिखट कमी असेल तर त्यांना जेवण रुचकर लागत नाही. तिखट खाताना भलेही कितीही घाम किंवा डोळ्यांतून पाणी येऊ दे, ते तरीही तिखट खाणं सोडत नाहीत. दरवर्षी स्कॉटलंडमध्ये तिखट खाण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगातील सर्वात तिखट पदार्थ ‘किलर करी’ खावा लागतो. यात अनेकजण उत्साहाने भाग घेतात, पण कोणालाही हा पदार्थ पूर्ण खाण्यात यश आलेलं नाही. अनेकांना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. अशात जर तुम्हालाही तिखट खाणं आवडत असेल तर जरा सांभाळून. एका संशोधनानुसार, दररोज 50 ग्रॅम मिर्ची खाल्यास डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.

अति तिखट पदार्थ खाता, मग तुम्ही हे नक्की वाचा – Over spicy food eating is not good for health :

50 ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात तिखट खाण्यात आल्यास स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते तसेच मेंदूचे कार्यही मंदावू शकतं असं संशोधकांचं मत आहे. ‘कॅप्सिकीन’ हा मिरचीमधला महत्त्वाचा घटक. हा चांगला परिणाम वजनवाढ रोखण्यास मदत करतो; पण तरीही अतितिखट खाण्यामुळे तिखटाचे चांगले परिणाम झाकोळले जाऊ शकतात. (Are spicy foods healthy or dangerous?)

अभ्यासकांच्या मते ज्यांचं वजन हे सामान्य आहे, जे शारीरिक कष्ट जास्त करतात त्यांना जास्त तिखट खाण्यामुळे धोका आहे. तुलनेनं ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना तिखटाचा हा नकारात्मक परिणाम इतका जाणवत नाही. दिवसभरात 50 ग्रॅमपेक्षा जास्त तिखट खाण्यामुळे स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अतितिखट खाण्याची, खाताना वरून तिखट भुरभुरून किंवा कच्च्या मिरच्या घेऊन खायची आवड असेल तर तिला आवर घालण्याचा इशारा हा अभ्यास देतो.

Over-spicy-food-eating-health-Effects

Ugly Dangers of Eating Spicy Foods, According to Science :

डिमेंशियाची लक्षणं:

  • महत्त्वाच्या गोष्टी विसरणं, त्यातही नुकतीच घडलेली घटना विसरणं
  • स्वतःमध्येच राहणं, गप्प राहणं आणि भेटी- गाठी बंद करणं
  • छोट्या- छोट्या गोष्टींवर आणि कारण नसतानाही चिडचिड करणं, ओरडणं, रडणं
  • कतार विद्यापीठातील संशोधक जुमिन शी यांच्या नेतृत्वाखाली 55 वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या 4 हजार 572 चिनी लोकांवर संशोधन करण्यात आलं. यात त्या लोकांची स्मरणशक्ती झपाट्याने कमकूवत होताना दिसली जे जररोज 50 ग्रॅम किंवा त्याहून जास्त तिखट खातात. दररोज तिखट खाणाऱ्यांना स्मरणशक्ती कमकूवत होण्याचा धोका इतरांपेक्षा दुप्पट असतो.
  • टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

News English Summary: Many have a habit of eating spicy, spicy food. If the food is a little less spicy, they do not like the meal. No matter how much sweat or tears come out while eating chili, they still do not stop eating chili. A chili eating competition is held every year in Scotland. In this competition, you have to eat the most spicy food in the world, ‘Killer Curry’. Many enthusiastically participate in it, but no one has been able to eat it whole. Many had to be hospitalized. So if you also like to eat red chilies, be careful. According to one study, eating 50 grams of chili per day increases the risk of developing dementia.

News English Title: What Happens To Your Stomach When You Eat Over Spicy.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x