19 April 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

नारायण राणेंची ED चौकशी होणार या भीतीनेच सरळ भाजपमध्ये पळ काढला

Shivsena MLA Vaibhav Naik, BJP MP Narayan Rane, ED inquiry

कणकवली, ३० डिसेंबर: नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भारतीय जनता पक्षात पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर केली. ते सिंधुदुर्गात माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलत होते.

भाजप नेते नारायण राणेंनी मागील १० वर्षे अनेक आव्हाने आणि भविष्यवाणी केली. काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचं पुढे काय झालं हे लोकांना माहीत आहे, असं टीकास्त्रही वैभव नाईकांनी सोडलं. त्यामुळे राणेंच्या भविष्यवाणीला आता लोक काडीची किंमत देत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा समाचार घेतलाय.

मागील १ वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असं राणे अनेक वेळा म्हणाले होते. परंतु एक वर्षाच्या कालावधीनंतर हे सरकार अजून भक्कम झालं. तसेच भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले अनेक आमदार हे पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत पुन्हा येतायत आणि पोटनिवडणूक लढवण्याची त्यांची मानसिकता तयारी झाली, अशी माहिती देखील शिवसेना आमदार वैभव नाईकांनी दिली आहे.

 

News English Summary: Fearing that Narayan Rane’s ED would be investigated, he fled straight to the Bharatiya Janata Party, so Rane has no right to speak against Sanjay Raut, ”said Shiv Sena MLA Vaibhav Naik. He was speaking to media representatives at Sindhudurg.

News English Title: Shivsena MLA Vaibhav Naik made serious allegations over BJP MP Narayan Rane news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x