20 April 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

IT Returns | आयकर परतावा भरण्यास मुदत वाढ | मिळाले एवढे दिवस

IT returns filing, deadline extended, January 10

मुंबई, ३० डिसेंबर: आयकर परतावा अर्थात Income Tax Returns भरायची गुरुवारी म्हणजे 31 डिसेंबर ही शेवटची मुदत होती. पण तुमच्यापैकी ज्यांनी आर्थिक वर्ष 2019-2020 साठीचे टॅक्स रिटर्न्स अद्याप फाइल केले नसतील, तर एक दिलासादायक बातमी आहे. आयकर विभागाने IT Returns भरायची मुदत पुन्हा एकदा 10 दिवसांनी वाढवली आहे.

आता वैयक्तिक आयकर परतावा भरण्याची मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या वर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. सगळं अर्थचक्रच काही काळ थांबलं होतं. त्यामुळे दरवर्षी जून-जुलैमध्ये भरले जाणारे टॅक्स रिटर्न्स या वेळी डिसेंबरपर्यंत लांबले. आता थेट 2021 च्या 10 जानेवारीपर्यंत मुदत गेल्या आर्थिक वर्षाचे रिटर्न्स फाइल करण्यासाठी देण्यात आली आहे.

तर ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्य़ात आली आहे. याचबरोबर जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे. 2019-20 (असेसमेंट वर्ष 2020-21) मध्ये जवळपास 43.7 दशलक्ष आयटी रिटर्न 28 डिसेंबरपर्यंच दाखल झाल्याचे आयकर विभागाने मंगळवारी सांगितले होते.

 

News English Summary: Thursday, December 31 was the last date to file Income Tax Returns. But for those of you who have not yet filed your tax returns for fiscal year 2019-2020, this is good news. The Income Tax Department has once again extended the deadline for filing IT Returns by 10 days.

News English Title: IT returns filing deadline for individuals is extended till January 10 finance ministry news updates.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x