25 April 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

सेलिब्रिटीं संपर्कात, महागाईने होरपळणारा सामान्य 'संपर्क क्षेत्राच्या' बाहेर ?

मुंबई : सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर आहेत. अमित शहा आज मुंबईमध्ये प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सुद्धा त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. एकूणच देशभरातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आणि कर्नाटकातील राजकीय कलाटणीने भाजपची झोप उडाल्याचे चित्र आहे.

‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियाना अंतर्गत देशातील प्रख्यात लोकांना भेटण्याचा आणि त्यांचं समर्थन मिळविणे यावर जोर देण्यात येणार असल्याचे समजते. परंतु ज्या सेलिब्रिटींचे समर्थन मिळविण्यासाठी भाजपचं नैतृत्व जितकी मेहनत घेताना दिसत आहे, तेवढी मेहनत त्यांनी सामान्यांचे विशेष करून महागाईसारखे प्रश्न सोडविण्यासाठी घेतली असती तर ते आगामी निवडणुकीसाठी फलदायी ठरलं असतं.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपने सुरु केलेलं ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानाची सामान्य चांगलीच खिल्ली उडवत आहेत. प्रश्न केवळ सेलिब्रिटींच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणे एवढाच उद्देश नसून त्यांना भाजपकडून निवडणूक लढविण्याची ऑफर सुद्धा दिली जाईल. प्रसिद्ध माजी क्रिकेपटू कपिल देव हे त्यातीलच एक उदाहरण ज्याला निवडणुकीची ऑफर दिली गेली आणि ती त्याने कोणताही विलंब न लावता धुडकावली सुद्धा. भाजप कडून हाच प्रयत्न कर्नाटक निवडणुकीत अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांच्या बाबतीत सुद्धा झाला होता.

सध्या भारतीय राजकारणाची हवा उलटी वाहू लागल्याचे भाजपच्या वरिष्ठांना चांगलेच ध्यानात आले आहे. त्यामुळे २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातून आयात केलेले उमेदवार कधी घर वापसी करतील याची भाजपला सुद्धा खात्री नसावी. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवार मिळेनासे झाले तर परिस्थिती आणखीनच बिघडेल याची त्यांना कल्पना आली असावी. त्यामुळेच सामान्यांना परिचयाचे चेहरे ‘संपर्क फॉर समर्थन’ मधून जोडून त्याच मार्केटिंग करायचं अशी योजना असावी.

परंतु २०१४ मध्ये अनेक ‘टॅग लाईन’ आणि ‘नारे’ देत सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या या नवीन ‘संपर्क फॉर समर्थन’ अशा अजून एका नवीन टॅग लाईनला सामान्य नागरिक किती महत्व देतील यावरच प्रश्न चिन्हं आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x