24 April 2024 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

गुजरातची सत्ता किती काळ भाजपकडे | मग अहमदाबादच नाव का बदललं नाही? - आ. अमोल मिटकरी

NCP MLA Amol Mitkari, BJP, Aurangabad, Sambhajinagar

मुंबई, ६ जानेवारी: महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षादरम्यान आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाने या मुद्यावरून शिवसेनेला विशेष लक्ष केलं आहे. मात्र आता भाजपाला देखील याच मुद्यावरून कोंडीत पकडण्यास महाविकास आघडीतील नेत्यांकडून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पक्षावर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गुजरातची सत्ता किती काळ भारतीय जनता पक्षाजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भारतीय जनता पक्षात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने घोषणा केली होती की आमची सत्ता आल्यावर अहमदाबाद शहराचं नाव बदलू… तिथं कित्येक वर्षे तुमचंच सरकार आहे, मग आजून अहमदाबादचं नाव कर्णावती का झालं नाही?, असं मिटकरी म्हणाले. तर भारतीय जनता पक्षाच्या काळात कर्णावती झालं नाही तर गुजरातची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, दुस-याच दिवशी कर्नावती नाव आम्ही करुन दाखवू, असं देखील मिटकरी म्हणाले आहेत.

 

News English Summary: NCP MLA Amol Mitkari has attacked the Bharatiya Janata Party. Instead of renaming cities, change your attitude, says Mitkari. If there is real strength in the Bharatiya Janata Party, then keep the word given and name the city of Ahmedabad as Karnavati, is the challenge given by Mitkari to Chandrakant Patil. Chandrakant Patil had criticised the renaming of Aurangabad. Mitkari has strongly responded to his criticism.

News English Title: NCP MLA Amol Mitkari criticised BJP over Aurangabad renaming as Sambhajinagar news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x