29 March 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

मुंबई महापालिका निवडणुक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली

Deputy CM Ajit Pawar, Mumbai Municipal election, Mahavikas Aghadi, Shivsena

मुंबई, ७ जानेवारी: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादीत सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होऊन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.

दरम्यान, औरंगाबाद शहाराचं नामकरण संभाजी नगर करण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालायने बुधवारी मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती देताना औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजी नगर असा केला, ज्यावर महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. या वादावर आता अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘राज्यात अनेक निर्णय हे प्रशासकीय पातळीवर अधिकारी जाणीवपूर्वक घेत आहेत का? याबाबत चौकशी सुरू केली आहे. काही निर्णय मंत्र्यांना कळवले जातात का? याबाबत तपासणी सुरू आहे’. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

 

News English Summary: Congress has given the slogan of self-reliance for Mumbai Municipal Corporation elections. Shiv Sena is also preparing for the Mumbai Municipal Corporation elections. As a result, Mahavikas Aghadi Mumbai Municipal Corporation will fight together. Meanwhile, NCP leader and Deputy Chief Minister Ajit Pawar has clarified his role. He was talking to reporters in Mumbai.

News English Title: Deputy CM Ajit Pawar clear his stand over upcoming Mumbai Municipal election news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x