19 April 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला | यावेळी वेगळं चित्र दिसेल - आशिष शेलार

MLA Ashish Shelar, Thane municipal corporation election, BJP Mayor

ठाणे, ९ जानेवारी: ठाण्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला, परंतु, आता हे चित्र बदलेले सर्वांना दिसणार असून ठाण्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

कोपरी येथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आज (९ जानेवारी) शेलार देवीच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी हे विधान केले. तसेच ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन समाजसेवा करण्याचा सूचना यावेळी शेलार यांनी दिल्या.

आतापर्यंत युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये नेमही शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळी निवडणूक लढणार आहेत. यावेळी राज्यातील सर्व महापालिकांवर भारतीय जनता पक्षाचाच महापौर निवडून येणार,” असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात कोपरी प्रभागात देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाला सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले नाशिकचे वसंत गीते आणि सुनिल बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावरही आशिष शेलार यांनी टीका केली.

 

News English Summary: In the history of Thane, it is because of the alliance between BJP and Shiv Sena that Shiv Sena has become the mayor till now, but now everyone will see that the picture has changed and BJP will have a mayor in Thane, said Ashish Shelar, MLA in charge of BJP in Thane.

News English Title: BJP MLA Ashish Shelar talked on upcoming Thane municipal corporation election news updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x