29 March 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

MPSC परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर | वाचा सविस्तर

MPSC board, dates of Examinations

मुंबई, ११ जानेवारी: MPSC बोर्डानं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या नंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आला होत्या. मात्र आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली असून विद्यार्थ्यांकडे अगदी कमी दिवस उरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 27 मार्चला घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही मात्र साधारण ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.

 

News English Summary: After the MPSC board announced the dates of its examinations, now the dates of pre-service examinations have also been announced by the administration. Corona had postponed the dates of these tests. But now the date of pre-service examination has been announced and the students have very few days left.

News English Title: MPSC board announced the dates of its examinations news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x