20 April 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम वेगाने सुरू | प्रवासही नयनरम्य होणार

CM Uddhav Thackeray, Mawla Machine, digging tunnel, Coastal Road

मुंबई, ११ जानेवारी: मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गातील दोन महाबोगदे खोदण्याचं काम आजपासून सुरू झालं असून ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने हे दोन महाबोगदे खोदले जाणार आहेत. या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिरवा कंदील दाखवला.

कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘मावळा’ या अजस्त्र बोरिंग मशिनचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 2013 मध्ये कोस्टल रोड बांधण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर कोस्टल रोडच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. या कामासाठी 12 हजार 721 कोटी रुपये करण्यात येणार आहेत.

उपनगरातील जनतेला थेट शहरात अधे-मधे न थांबता यायचे झाल्यास आता हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यांचा प्रवासही नयनरम्य होणार आहे. मुळात या समुद्री मार्गात भुयारी मार्गाच मोठ्या लांबीचा आहे. त्या कामाची आपण आज सुरवात करणार केली.

बोगदा खणणारं मावळा मशीन हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. या मशीन १२.१९ मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम मशीन आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे.

 

News English Summary: Construction of Coastal Road in Mumbai is in full swing. The work of digging two mega tunnels in this route has started from today and these two mega tunnels will be dug by ‘Mawla’ tunnel boring machine. Chief Minister Uddhav Thackeray gave the green light to this work today.

News English Title: CM Uddhav Thackeray inaugurates Mawla Machine digging tunnel for Coastal Road news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x