19 April 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मराठा आरक्षण | खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार | पवार, अशोक चव्हाणांची बैठक

Minister Ashok Chavan, Sharad Pawar, Maratha reservation

नवी दिल्ली, १२ जानेवारी: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या 25 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर आदी नेते दिल्लीत आले आहेत. या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी पाऊण तास चर्चा केली. या बैठकीत चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती दिली.

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे याेनी या आधीही केली होती. आता पुन्हा एखदा विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला चव्हाण दिल्लीत गेले आहेत, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावर येत्या २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला याचिकाकर्ते, वकील आणि सीनियर कौन्सिल यांना घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. परंतु, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेशही पाळले नाहीत. पण चव्हाण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन बैठकीला गेले आहेत, असा आरोप मेटे यांनी केला होता. चव्हाण मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

 

News English Summary: Chairman of Maratha Reservation Sub-Committee Ashok Chavan today called on NCP’s Sarvesarva Sharad Pawar in Delhi. During the meeting which lasted for about half an hour, the two leaders discussed the issue of Maratha reservation. At this time, it was decided to take a delegation of MPs from Maharashtra to the Prime Minister to resolve the Maratha reservation issue.

News English Title: Minister Ashok Chavan meet Sharad Pawar discussing on Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x