25 April 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्यानंतर आशिष शेलार पवारांच्या भेटीला

BJP MLA Ashish Shelar, Sharad Pawar, Maratha Reservation

नवी दिल्ली, १२ जानेवारी: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शेलार अचानक पवारांच्या भेटीने आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार हे शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून चर्चा सुरू आहे. परंतु, शेलार यांनी नेमकी कशासाठी पवारांची भेट घ्यायला आले आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पवार मुंबई-पुण्यात सतत असतात असं असताना त्यांची मुंबई किंवा पुण्यात भेट घेण्यासाठी शेलारांना दिल्ली का गाठावी लागली? असा सवाल केला जात आहे. शेलार-पवारांच्या अचानक होत असलेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

परंतु आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचं नेमकं कारण सांगितलं. आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेत मराठा आरक्षणावर चर्चा केली. “मराठा आरक्षण प्रकरणी मराठा तरुणांच्या भावना शरद पवारांना माहिती आहेत. या भावना अतिशय तीव्र आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आऱक्षणाची बाजू मांडताना या विषयाचं गांभीर्यही शरद पवारांना माहिती आहे,” असं आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करावी तसंच आरक्षणाविषयी तातडीने योग्य कायदेशीर पावलं लगेच उचलावीत याबद्दल सुद्धा शरद पवारांसोबत चर्चा केली”.

 

News English Summary: Along with Congress leader Ashok Chavan, BJP MLA Ashish Shelar has also arrived at the residence of NCP supremo Sharad Pawar. Sources said that the two leaders have been at loggerheads for the last half an hour. Shelar is surprised by Pawar’s sudden visit and arguments are being fought.

News English Title: BJP MLA Ashish Shelar meet Sharad Pawar over Maratha Reservation issue news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x