28 March 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

लस सुरक्षित? | जागतिक नेते आणि ५६ इंच वाले | काँग्रेसकडून खिल्ली

Congress spokesperson Salman Nizami, PM Modi, Corona vaccination

नवी दिल्ली, १३ जानेवारी: भारतात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. केंद्र सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही येत नसाल पण तुम्हाला कोरोना लस हवी आहे तर मग काय? सर्वसामान्यांसाठी या लशीची किंमत किती असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपली कोरोना लस कोव्हिशिल्डची किंमत जारी केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मोदी सरकारला कोविशिल्ड लसीचा एक डोस 200 रुपयांना देणार आहे. तर बाजारात ही लस प्रति डोस 1000 रुपयांना उपबल्ध होईल. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. कोविशिल्ड ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केली आहे.

पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

दरम्यान, प्रगत देशांमध्ये सुरु झालेल्या लसीकरणातून काही नकारात्मक परिणाम झालेली प्रकरणं देखील समोर आली आहेत. त्यामुळे या देशातील नागरिकांच्या मनात शंका निर्माण होताच संबंधित देशातील दिग्गज नेते स्वतः ऑन कॅमेरा लस घेऊन सामान्य लोकांचा विश्वास वाढवत आहेत. दुसरीकडे भारतात मागील २ दिवस ‘पहिला टिक्का मोदींना’ हॅशटॅग ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मोदींनी लस सुरक्षित असल्याचं देशवासियांना सिद्ध करून दाखवण्यासाठी स्वतः देखील लस टोचून घ्यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते सलमान निझामी यांनी एक ट्विट करत लस घेणाऱ्या त्या जगभरातील दिग्गज नेत्यांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, “जागतिक नेते आणि ५६ इंची नेते”. त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोदींची खिल्ली उडवली आहे.

 

News English Summary: There have also been cases of vaccines being introduced in developed countries with some negative effects. Therefore, whenever doubts arise in the minds of the citizens of this country, the veteran leaders of the respective countries themselves are increasing the confidence of the common people by taking on-camera vaccines. On the other hand, in the last two days, the hashtag ‘First Tikka Modi’ has been trending in India. Therefore, the opposition has demanded that Modi should inject himself to prove to the people that the vaccine is safe. As part of that, Congress spokesperson Salman Nizami tweeted a photo of the world’s veteran leaders taking the vaccine, saying “world leaders and 56-inch leaders”. He has indirectly mocked Modi.

News English Title: Congress spokesperson Salman Nizami criticised PM Modi before corona vaccination news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x